ब्रेकींग न्यूज… मित्रांनी केली मित्राचीच दगडाने ठेचून हत्या… 

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

              येवदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वरुड कुलट येथे दि १३ गुरुवार दुपारी ३ वाजताचे सुमारास दारूच्या नशेमध्ये सुनील संपत पाखरे वय ३८ वर्ष या इसमाची दगडाने ठेचून मित्रानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे.या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

       मृतक सुनील पाखरे व त्याचा मित्र योगेश पुंडकर सोबतच दारू पित होते. मात्र आज अचानक गावातील मुख्य चौकामध्ये त्यांचा वाद झाला व या वादातुनच सोबतच असणाऱ्या योगेश नाना पुंडकर वय ३२ वर्ष याने सुनील पाखरे यांच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.

         सदर घटनेनंतर आरोपी हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती येथील पोलीस पाटलांनी येवदा पोलीस स्टेशनला दिली त्यानुसार येवदा पोलिसांनी घटनास्थळ घाठून घटनेचा पंचनामा केला.

          सदर मृतक सुनील पाखरे याला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करिता दाखल करण्यात आले आहे.या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

          सदर घटनेचा तपास दर्यापूर एस डी पी ओ गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनात येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार लक्ष्मण ढेंगळे , उपनिरीक्षक गजानन सोनोने व पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र तायडे, पंकज नळकांडे , अनिल भटकर ,शरद सारसे ,प्रभाकर दलाल इत्यादी करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.