चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि भंडारा
साकोली:-शहरात सोमवारला सकाळीच विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेकांची झोपच उडाली जनता साखर झोपेतून जागी होता क्षणी बत्ती गुल झाल्याने उष्णतेमुळे घामाने आंघोळ झाल्याने नागरिक त्रस्त झाले.
अवकाळी होणाऱ्या पावसामुळे तापमानात बदल झालेला आहे. त्यामुळे विद्युत बंद झाल्यावर लगेच घामाच्या धारा वाहू लागतात.परंतु, महावितरण विभागाने कुठले प्रकारचे संदेश न देता विद्युत प्रवाह दोन ते तीन तासासाठी बंद केल्यामुळे नागरिकांण्णा विद्युत विना राहावे लागले.
त्यामुळे पाण्याचे नाही तर घामाने आंघोळ केल्याचे अनुभूती लोकांना आली. तसेच सदर पुरवठा खंडित करायचे पडल्यास नागरिकांना माहिती संदेश पाठवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.