कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने नागरिक त्रस्त!.. — नांदरून येथील रोहित्र मागील तीन,चार वर्षापासून पूर्णता बंद…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

         गेल्या काही दिवसांपासून नांदरून या परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने रात्रीच्या सुमारास वारंवार विजपुरवठा खंडीत होतो आहे. मागिल दहा ते पंधरा दिवसापासून नांदरून, भामोद, सामदा, सासन या परिसरातील गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार विज पुरवठा खंडीत होत आहे.

      तसेच दिवसभर विजेचा लपंडाव सुरू आहे. नांदरून परिसरात रोज रात्री १० वाजताच्या सुमारास रोज विज पुरवठा खंडीत होत तर कधी विज पुरवठा पूर्णता डिम झालेल्या दिसत आहे.

        उन्हाळा असल्याने तापमानात दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याने वारंवार खंडीत हाेत असलेल्या विजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा पाणीपुरवठ्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

           अशातच नांदरून येथील ठिकाणी तर रोहित्र मागील तीन ते चार वर्षपासून शोभेची वस्तू बनलेली आहे. या रोहीत्रा वर महावितरण विभाग व ग्रामपंचायत यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

         या नादुरुस्त रोहीत्राकडे अनेकांच्या नजरा आकर्षित करत आहेत, काही ठिकाणी बंद आहेत, तारा संपूर्ण गावात लोंबकलेल्या आहेत.झाडाच्या फांद्या तारामध्ये येत असल्याने विजपुरवठा खंडीत हाेत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.