मोहली जि.प. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित…

 भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी

         धानोरा तालुक्यातील मोहली जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मागील तीन वर्षापासून शिष्यवृत्ती पासून वंचित असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तिनं वर्षा पासून येथिल मुख्याध्यापकांनी काहीच प्रयत्न केले नाहीत का?तिनं वर्षा पासून महा डिबिटि पोर्टल वर कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव कसे नाही. पण ह्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणीच तयार नसल्याने.या नुकसानीला जबाबदार कोण? विद्यार्थाचि गेलेली शिष्यवृत्तीचि भरपाई कोणाकडून केली जाणार असा प्रश्न विद्यार्थ्यांचे पालक विचारीत आहेत.

        मोहली येथे जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालया असुन येथे वर्ग 5वि ते 12वि पर्यंन्त चे वर्ग आहेत.त्यापैकी 11,वी चे वर्ग 2021मध्ये सुरू करन्यात आले.शिक्षण घेणारे विद्यार्थी मागील तीन वर्षापासून शिष्यवृत्ती पासून वंचित असल्याचे विद्यार्थ्याचे पालक सांगतात.

            सन 2021 -22 पासून कनिष्ठ महाविद्यालयाला स्वयंअर्थसहायत्त तत्वावर कला व विज्ञान शाखेची परवानगी मिळाली. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले. मात्र सदर महाविद्यालयांमध्ये पुर्ण वेळ अध्यापन करणारे प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. जे नियुक्त केलेले प्राध्यापक आहेत ते तासिका तत्वावर असून ते आपला पूर्ण वेळ शाळेला आणि विद्यार्थ्यांना देवू शकत नाही.

           शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्णही करू शकत नाही याची खंत शालेय विद्यार्थी बोलून दाखवतात. वर्ग 11, 12वी कला, विज्ञान शाखेत शिक्षक घेन्नार्या शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते.एससी ,एनटी, ओबीसी, एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी द्वारे आँनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म भरावा लागतो.भरलेला अर्ज संबंधित विभागाला पोहचवा लागतो.

             हा शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी कॉम्प्युटर किंवा कॅफेमध्ये गेले असता शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत असताना दिसणाऱ्या कॉलेजच्या यादीमध्ये जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोहलि महाविद्यालयाचे नाव येत नाही.यादीत नाव दिसत नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा फॉर्म भरता येत नाही आहे.या गोष्टी ला3 वर्ष झालेत.पण यात काहीच सुधारणा झालेली नाही.याची कल्पना शाळेला देण्यात आली असल्याचे विद्यार्थी सांगतात.

             महाडिबिटिवर शाळेचे नाव दिसत नसल्यामुळे शालेय विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित आहेत .हे विद्यार्थ्याचं खूप मोठं नुकसान असून विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण करण्याकरिता शिष्यवृत्तीचे नितांत गरज असते आणि ही शिष्यवृत्ती ज्या विभागाकडून मिळते त्या विभागाने अजून पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयाला विचारणा केली नाही काय?. मात्र मागील तीन वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी गेले पण नाव नसल्याने आल्या पावली परतावे लागले.

           आता काँलेज मधुन निघून गेलेल्या विद्यार्थ्यांची नुकसान भरपाई कोणाकडून केली जाणार, महाडिबिटि काँलेजचे नाव का नाही.यासाठी शाळेने प्रयत्न केले कि नाही.आणि समोर किती वर्ष नाव दिसणार नाही.विद्यार्थि पुन्हा किती वर्ष शासनाच्या कल्याणकारी योजना पासुन वंचित रहावे लागणार. याबाबत कोणाला जबाबदार धरणार याबाबत यांची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीला वर कारवाई करण्याची मागणी शाळेत शिक्षण घेन्नार्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

            धानोरा तालुक्यातील मोहोली येथे मोठा गाजावाजा करून जिल्हा परिषद ला कनिष्ठ महाविद्यालय जोडण्यात आले. परंतु खऱ्या अर्थाने कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ प्राध्यापकांची गरज होती परंतु आज तक पूर्णवेळ प्राध्यापक नियुक्त करण्यात न आल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान केल्या जात आहे.

          जर पूर्णवेळ प्राध्यापकांचे नियुक्ती करायचीच नव्हती तर कनिष्ठ महाविद्यालय का सुरू केले? हे तर विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने फसगत केल्याची दिसून येते.त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान त्यासोबतच शिष्यवृत्ती पासून वंचित रहावे लागत असल्याने संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. 

बाईट-

       विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आवश्यक आहे.हिच शिष्यवृत्ती मुलामुलींना मिळत नसेल तर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.यांची सखोल चौकशी करून शासनाच्या शिष्यवृत्ती पासून विद्यार्थ्यांना दुर ठेवनाऱ्या यंत्रणेवर कारवाई करावी.

             नरेद्र के.भुरसे सामाजिक कार्यकर्ते रांगी शाळेचे मुख्याध्यापक नरोटे यांच्याशी दिनांक 11/5/2024 ला भ्रमणध्वनी वरुण संपर्क केला असता.MAHADBT PORTAL विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी संबधित विभागाशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगितले.