“नरम,गरम आणि बेशरम तोच राजकारणी….        — डॉ. बाबासाहेब आंबेडकर

         2024 च्या काळातील सर्वच राजकीय पक्षांच्या राजकारण्यांच्या बाबतीत वरील व्याख्या जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली ती सार्थच आहे..!

 कारण……

      राजकारणी ( साम, दाम, दंड आणि भेदाच्या कूटनितील रंगेल ) माणुस तत्वज्ञ बनू शकत नाही, परंतू ,तत्वज्ञानी माणसाला राजकीय सिद्धांतावर राजकारणी बनवता येऊ शकते…. “

 — सॉक्रेटीस ( ग्रीक तत्वज्ञ)

         “वरील दोन्ही तत्वज्ञानाचा या लेखात आपण परामर्श घेऊया…..

       स्वातंत्र्यापूर्वी पंजाब मधील जालीयनवाला बागेत जनरल डायरने गोळीबार करून अनेक स्वातंत्र्य सैनिकांना शहिद केले….!

         याचा उच्चार दरवर्षी 15 ऑगस्ट च्या भाषणात आमचे राजकीय नेते हमखास करतात.

        परंतू,1984 च्या भोपाळ वायुकांडात एका रात्रीत 15,000 लोकांचा झोपेतच मृत्यू झाला.अनेक कायमचे अपंग झाले.जबाबदार असलेल्या त्या कंपनीच्या मालकाला तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांनी त्याच्या मायदेशी घालवले. 32 वर्षानंतर जेंव्हा या घटनेचा निकाल ( न्याय नव्हे ) सर्वोच्च न्यायालयाने दिला,तेही क्षुलक आर्थिक दंडाची व कारावासाची शिक्षा देऊन…..!

    वरील दोन्ही दुर्घटना तुलनात्मक विचार केला तर काय लक्षात येते?

         हे मी वेगळं सांगण्याची आवशकता नाहीं.

        त्याचप्रमाणे याच देशातील जगाचा पोशिंदा आपल्या न्याय हक्कासाठी संसदेने केलेल्या जाचक 3 कृषी कायद्याविरोधात राजधानीत दीड वर्षे आंदोलन करतात.

         येथील केंद्र सरकार त्यांना रस्त्यावर खिळे ठोकून,आंदोलन चिघळवतात.परंतू,कसलीही चर्चा न करता आंदोलन हाणून पाडण्यासाठी 700 च्या वर शेतकऱ्यांना चिरडून ठार मारतात…………!

    ही कोणती लोकशाही?

     हे कोणते स्वातंत्र्य?

     हे कोणते राष्ट्रपती?

     हे कोणते प्रधानमंत्री?

     हे कोणते विरोधी पक्ष?

     हे कोणते न्यायालय…..?

     ही कोणती जनता….?

( जी या विरोधात रस्त्यावर उतरू शकत नाही )

ही कोणती पत्रकारिता….?

     ( जी सरकारच्या विरोधात एक शब्दही बोलू किंवा लिहू शकत नाहीं )

     ही कोणती जनतेची अन्याय सहन करण्याची संवेदना?

       वरील सर्व प्रश्नांचे कारण आणि उत्तर हे, वरील दोन्ही तत्वज्ञानात दडलेले आहे!

       कारण आम्ही ( 140 कोटी जनता ) 2024 च्या काळात या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे क्षुल्लक स्वार्थापोटी अहंकारातून अंधभक्त होऊन विभूतीपूजेचे पीक जोमात आणलं.त्यामुळे आम्ही या लोकशाहीला आणि संविधानाला ICU मध्ये ढकलून दिले आहे……!

         आमच्यात मतदानाचा ज्वर जसजसे मतदान जवळ येते तसतसे वाढत जाते,त्याप्रमाणेच आम्ही भावनेच्या आहारी जाऊन कसलाही विचार सदवीचार न करता कोणत्यातरी प्रलोभनाला बळी पडून एकदाचे बटण दाबतो.

          परंतू गेल्या महिन्याभरापूर्वी कुणाला मतदान करायचे जो ठाम निर्णय आम्ही घेतला होता,तो शेवटच्या दिवशी का बदलला?

   याचे समर्पक उत्तर आमच्याकडे मुळी नसतेच….

असं का होतं?

   याचा विचार आम्ही कधी करणार?

     गेल्या 75 वर्षात आमच्या देशात लोकशाही न रुजण्याचे हे एक मुख्य कारण आहे.

       एक तर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे.त्याला कारणीभूतही आपणच आहोत.कारण पाच वर्षातून येणारी निवडणूक म्हणजेच लोकशाही…

     आणि आरक्षणाचा लाभ घेण्यासाठीच संविधानाची निर्मिती झालेली आहे…..!

      असा गैरसमज आमचा ( 140 कोटी जनतेचा ) झालेला आहे…

        शिवाय आमची जात,आमचे कुळ,आमचा पंथ, आमचा धर्म,आमचा समाज ही संकुचित विचारसरणीच आमचा घात करत आहे…..

      याच आमच्या मानसिकतेचा लाभ येथील राजकारणी मंडळी उठवून आम्हाला पुन्हा 5 वर्षाचे आपले गुलाम बनविण्यास सिद्ध होते….!

        आमचा बुद्धीजीवी वर्ग सुद्धा याच व्यवस्थेचे गुलाम बनण्यासाठी एका पायावर तयार असतो….

     म्हणून केवळ 75 वर्षात आम्ही गुलामीच्या दिशेने कोरोनाच्या गतीने धावत आहोत.

        आम्ही महापुरुषांना जाती जातीच्या डबक्यातील स्मारकामध्ये बंदिस्त केले नसते,आणि त्यांचा वैचारिक वारसा आचरणातून अनुयायी म्हणून सिद्ध केला असता,तर ही वेळ आमच्यावर निश्चितच आली नसती.

      आमच्या देशातला प्रत्येक नागरिक हा कोणत्या ना कोणत्या धर्माचा अनुयायी आहे. त्याचप्रमाणे तो कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा अनुयायी आहे. त्याप्रमाणेच कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याचा समर्थक आहेच!

        परंतू,मानवताधर्म,तत्ववेत्ते आणि महापुरुष,आणि संविधानाला कुणी वालीच उरलेला नसल्यामुळे हे सर्व पोरके झाल्यामुळेच………

        आमची जगता जगता मरण्याची व मरता मरता जगण्याची दयनीय अवस्था अंधःकारमय भविष्यात सापडलो आहोत!

        एकतर आमच्या मताचा अधिकार EVM ने हिरावून घेऊन लोकशाहीचे दारच येथील व्यवस्थेने बंद करून टाकले आहे.

      पण तरीसुद्धा याच EVM चे बटण दाबन्याची नामुष्की आमच्यावर आलेली आहे.

       म्हणूनच मतदानाची टक्केवारी घटण्याचे हे एक मुख्य कारण आहे. शिवाय आम्ही ज्याला मतदान करून निवडून देऊ,तो त्याच पक्षात राहील याची शाश्वती काय?

   म्हणून सुद्धा मताची टक्केवारी कमी झालेली दिसते.

      आज जी 2024 च्या काळात देशाची व सर्वच राज्यांची आर्थिक कर्जबाजारी स्थिती,सर्वच क्षेत्रात भयावह वातावरण,महागाई व बेरोजगारीची तर सवयच झालेली…..!

        एकंदरीत या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे लोकशाहीतील सर्वच जबाबदार घटकांनी म्हणजेच आमदार,खासदार आणि नामदार या सर्वांनी कुटनीतीचा वापर जनतेला त्यांच्या न्याय हक्काची मुद्दामहून जाणीव करू दिल्या गेली नाही. जनतेच्या याच अज्ञानाचा आणि जाती धर्माच्या कोरड्या अहंकाराचा लाभ उठवला. राष्ट्रपती पदावर बसणारी व्यक्ती राजकीय पक्षातून न जाता ती तरी निदान तत्वज्ञ असायला हवी होती ( डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अपवाद सोडून ). न्यायालयीन प्रक्रियेत सुद्धा कॉलेजीयम पद्धतीमध्ये विशिष्ट वर्गालाच प्रतिनिधित्व मिळते ( जरी इतर अल्पसंख्यांकांना मिळालेच तरी त्यासाठी त्यांना आपला विवेक गहाण ठेवावा लागतो).

       पत्रकारिता तर आजच्या काळात सरकारच्या दबावाला किंवा आमिषाला बळी पडून जनतेची न्याय बाजू न घेता षंढ बनन्यातच धन्यता मानते!

       म्हणजेच एकंदरीत सारांश रूपाने विचार केला असता आजची देशाची सर्वच क्षेत्रातील जी पीछेहाट आहे. त्याला कारण केवळ आणि केवळ आम्हीच ( 140 कोटी जनता ) आहोत…….!

        यामुळे होणार काय तर शेवटी गरीब आणि श्रीमंतीची दरी. म्हणजे आर्थिक विषमता……..

      ज्यामुळे जगाच्या इतिहासात मानवी हक्काच्या रक्तरंजित क्रांत्या झाल्या!

        हे कधीही आमच्या देशातच काय पण जगात कुठेच घडू नये म्हणूनच तर……..

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्व जीवनभर संघर्ष करून त्यागातून आणि समर्पनातून,”भारताच्या संविधानाची,निर्मिती केली….. 

         परंतू,अवघ्या 75 वर्षात आम्ही त्याचे अंमलबजावणीच्या रूपाने पानही न उलटल्यामूळे ही आमची ( जनतेची ) अवस्था झालेली आहे.

      उलट तीला तसेच न उघडता बाजूला करून,कुटनीतीला सोयीस्कर अशा बनविण्यात आलेल्या भारताच्या नवीन अशा संविधानाला लागू करण्यासाठी RSS येथील चंगू – मंगूला हाताशी धरून, EVM च्या बळावर अब की बार 400 पारचा जो नारा दिल्या जात आहे तो यासाठीच.

       म्हणून हे जर या 2024 च्या काळात असं होऊ नये अशी प्रत्येकाची धारणा आहे. परंतू जर असे घडलेच…

    तर आम्ही ( जनता ) काय करणार……?

        आणि समजा नाही जरी झाले,आणि विरोधी पक्षाचे जरी सरकार आले.तरी संविधान जागृतीच्या बाबतीत गेली 75 वर्षे आम्ही झोपा काढल्या किंवा सोंगे घेतली. पुन्हा तेच करणार का.?

        “मी तरी स्वस्थ बसणार नाही,……..

      कारण हा देश, हे संविधान, ही लोकशाही,माझी आहे आणि मी यांचा आहे.शेवटी मी प्रथम आणि अंतिमता भारतीय आहे…

“आचरणातुन…..

              आवाहनकर्ता

               अनंत केरबाजी भवरे

       संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689…