
रमेश बामणकर
अहेरी तालुका प्रतिनिधि
अहेरी येथील अप्पर जिल्हाधिकारी मार्फत जिल्हाधिकारी संजय मिना साहेब यांच्याकडे भाजपा नगरसेवकांनी निवेदनाद्वारे केली मागणी..!!
नियमांना डावलून कोट्यवधी रुपयांची निविदा मर्जीतील कंत्राटदारांना देण्याचा व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची निवेदनातुन केली मागणी..!!
अहेरी नगर पंचायत द्वारे नगरोत्थान, दलित्तेतर तसेच अण्णाभाऊ साठे दलितवस्ती निधी २०२२-२३ ह्या कोट्यवधी रुपयांची विकास कामांची ऑफलाईन निविदा प्रक्रीया पुर्णपणे नियमबाह्य पध्दतीने नुकतेच करण्यात आले. संपुर्ण निविदा प्रक्रीयेबाबत मुख्याधिकारी दिनकर खोत आणि सत्ताधारी पक्षाने नगरसेवकांना कोणतीही माहिती दिली नाही, सर्वसाधारण सभेत सुध्दा माहीती न देता संदिग्धरित्या आणि घाईगडबडीत सर्व निविदा प्रक्रिया पुर्ण केल्या गेली, नियमानुसार सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत ऊल्लेख तसेच सर्वसाधारण सभेत L1 ला मान्यता सुध्दा न घेता थेट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) आपल्या मर्जीतल्या मोजक्याच कंत्राटदारांना देण्यात आलेले आहेत. मुख्याधिकार्यांविरोधात या आधी सुध्दा नियमबाह्य पध्दतिने काम करत असल्याच्या तक्रारी खुद्द नगराध्यक्षा व सभापतींनी सुध्दा केलेली आहे. त्यानंतरही मुजोरीने संदिग्ध पध्दतीनेच निवीदा प्रक्रीया राबविण्यात आलेली आहे.ह्यात मोठे व्यवहार झाल्याची शँका असून या वादग्रस्त निविदा प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावे तसेच ह्या वादग्रस्त निविदा प्रक्रीयेला ताबडतोब स्थगिती देऊन नव्याने पारदर्शक पध्दतीने निवीदा मागविण्यात याव्या अशी मागणी काल भाजपा नगरसेवकांनी अप्पर जिल्हाधिकारी अहेरी मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मिना साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले..!!
तातडीने ह्या वादग्रस्त निविदा प्रक्रियेला स्थगिती न दिल्या गेल्यास भाजपा तर्फे अहेरी नगर पंचायतला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सदर निवेदनातुन देण्यात आले आहे, निवेदन देतांना अहेरी नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती लक्ष्मी मद्दीवार, नगरसेविका शालिनी पोहणेकर, सुनीता मंथनवार, पूर्वी नामेवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास उईके, भाजपा तालुका महामंत्री संतोष मद्दीवार, मुकेश नामेवार, संजय पोहणेकर आधी उपस्थित होते..!!