
दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
दिनांक १३ मे गडचिरोली
संत निरंकारी मिशन च्या वतीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये नेहमीच आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे पवित्र कार्य सुरू असून त्यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी संत निरंकारी मिशन चामोर्शी शाखेच्या वतीने आयोजित रोगनिदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. निरंकारी मिशनचे झोनल इन्चार्ज तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री किसनजी नागदेवे, डॉक्टर पुरुषोत्तमजी अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा भाजपा जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष प्राध्यापक रमेशजी बारसागडे ,तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, रामचंद्रजी वरवाडे प्रतीकजी राठी, निरंकारी मिशनचे प्रकाशजी कुकरेजा, डॉक्टर अंकिताजी ,भारती जी ,जानवी जी, जीवनकलाताई बोरकुटे, निकुरेजी ,अशोकजी बोरकुटे, झोडगेजी ,यांचे सह मिशनचे प्रमुख पदाधिकारी व मिशनचे कार्यकर्ते उपस्थित होते*