कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी : – तालुक्यातील कन्हान पो.स्टे.च्या हदीतील पिपरी रामनगर येथे महिलेच्या नाबालिक मुलीला अश्लिल शिविगाळ करून पिडीतेच्या आईला डोक्यावर काठीने मारून रक्तबंबाळ केल्याने फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी गुन्हा दाखल केला.
याचबरोबर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केल्याने मा.न्यायाधिशानी आरोपी गणेश वाढवे याची कारागृहात रवानगी केली.
रामनगर पिपरी-कन्हान येथील फिर्यादी ३६ वर्षीय महिलेला तीन मुली आहेत व ती स्वमालकीच्या ४ एकर शेतीची मशागत करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करित असते. गणेश शुक्कल वाढवे वय ३५ वर्ष हा रामनगर मोहल्यात राहात असुन तो नेहमी दारू पिऊन तिला व तिच्या मुलीला शिविगाळ करित होता.
बुधवार ( दिं १०) ला सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान काही कामाने कन्हान येथे गेली असता,तीन्ही मुली घरी हजर होत्या.तक्रारदार अंदाजे ८.३० घरी परत आली. तेव्हा मुली जेवन करून झोपल्या होत्या.गुरूवार (दि.११) ला सकाळी १० वाजता ती शेतात जायला निघाली असता तिच्या पिडीत नाबालिक मधल्या मुलीने तिला सांगितले की,ती काल बुधवार (दि.१०) एप्रिल ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान दुकानात जात असताना मोहल्यातील गणेश वाढवे ह्यानी अश्लिल शिविगाळ करून तुझ्या आईला सांगशील तरी पाहुन घेईल.तेव्हा महिलेने मुलीला सोबत घेऊन त्याचे कडे गेली असता सकाळी ११.१५ वाजता गणेश वाढवे चौकात दिसल्याने त्यास म्हटले की ही तुझी बहिण लागते.तु हिला अश्लिल शिविगाळ का केली? तेव्हा त्यानी काहीही नाही बोललो म्हणुुन साफ नकार दिल्याने फिर्यादी महिलेने रागाच्या भरात त्याला दोन थापड मारल्याने त्याने शिविगाळ करून धमकी देत घरी जाऊन काडी आणली महिलेच्या डोक्यावर जोरात मारली.यामुळे ती महिला रक्त निघून जख्मी झाल्याने ती खाली बसली.
तेव्हा तो तेथुन पळुन गेल्याने महिलेनी मुलीला सोबत घेऊन कन्हान पोलीस स्टेशन गाठले व आरोपी गणेश वाढवे विरूध्द तक्रार दिली.
पोहवा रोशन देवतळे ह्यानी कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात आरोपी गणेश शुक्कल वाढवे वय ३५ वर्ष रा. रामनगर पिपरी-कन्हान यांचे विरूध्द पो. स्टे.कन्हानला अप.क्र. २७१/२०२४ कलम ३५४(अ) (१)(४), ३२४, ५०४ भादंवि व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करित कन्हान पोस्टेचे उपपोनि पराग फुलझेले व पोहवा सम्राट वनपती यानी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता मा.न्यायाधिशानी त्यास कारागृहात रवानगीचा आदेश दिल्याने आरोपी गणेश वाढवेला नागपुर कारागृहात रवाना करण्यात आले आहे.