मतदानाला जाताना हे विसरू नका…

     “तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान करणार आहात,त्याने तुमच्या कराच्या पैश्यातून आसाम, गुवाहाटीची वारी तर केली नाही ना….

      काय ती झाडी,काय ते हॉटेल,काय ते डोंगर……

म्हणून गेल्या वेळेस टाकलेल्या मताचा अनादर तर केला नाही ना….!

        शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधलेल्या धरणात पाणी नसेल तर,मी काय त्या धरणात………….?

     असं कुणी म्हणालं नाही ना….?

         70,000 कोटी रुपयांचा घोटाळा उघड केल्याशिवाय मी राहणार नाही.असं म्हटल्याबरोबर अगदी दोनच दिवसात गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन शुद्ध होऊन तत्वाला,नीतिमत्तेला तिलांजली देणाऱ्या गटाचा उमेदवार तर नाही ना…….!

        गेल्या दहा वर्षात एकही पत्रकार परिषद न आयोजित करता केवळ मन की बात माझ्यावर लादणाऱ्या (माझं कधीही ऐकून न घेता ) ……

       15 लाख रुपये माझ्या खात्यावर टाकतो म्हणणाऱ्या……

      15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येकाला पक्की घरे देण्याचे आश्वासन देणाऱ्या…….

      कोरोनाच्या काळात पी.एम. फंडात पॆसे टाकण्याचे आवाहन करून 32,000 कोटी रुपये जमा झाल्यानंतर त्याचा हिशोब कॅगने मागून सुद्धा त्याचा हिशोब न देणाऱ्या,उलट आपल्या सोईचा माणूस तिथे बसविणाऱ्या…….

       कोरोना काळात RBI कडून जबरदस्तीने पाऊणेदोन लाख कोटी रुपये घेऊन त्याचाही हिशोब न देणाऱ्या……..

       अमेरिकेकन दौऱ्याच्या वेळी तेथील व्हाईट हाऊसच्या 75 % खासदारांनी ज्याच्या भाषणावर बहिष्कार टाकला…….

         6 महिने मणिपूर जळत असतांना ज्याने कधी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही……

        आमच्या दोन भगिनींची नग्न धिंड ज्या जमावाने काढली त्यांच्या विरोधात एकही शब्द न काढता, पायाला भिंगरी लावून सर्व जगभर हिंडणाऱ्या परंतू जळत्या मणिपूरला एकही भेट न देणाऱ्या…….

         तीन कृषी कायद्याच्या विरोधात दीड वर्षे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 

750 शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या……

         EVM + VVPAT च्या बळावर अब की बार 400 पार म्हणून संविधान बदलण्याचा छुपा अजेंडा राबविणाऱ्या……..

    पक्षाला हॅट्ट्रिक करण्याची तुम्ही संधी देणार का…..?

      या प्रश्नांची उत्तरे शोधून विचार करा मगच मतदान करा….. चे

( आता दररोज निवडणुका होईपर्यंत “मतदानाला जाताना हे विसरू नका.”

हे सदर मतदार जागृतीसाठी चालू केले आहे. त्यासाठी प्रत्येकांनी जास्तीत जास्त व्हायरल करावे….)

***

           आवाहनकर्ता..

      अनंत केरबाजी भवरे (संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689)