डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली :तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबधीत पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलीस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.
मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्तीत जास्त शक्यता असल्यामुळे हरविले किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. या बाबीचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो. सन २०२२ या वर्षात एकुण १५० मोबाईल ज्यांची किंमत जवळपास २२ लाख रुपये एवढ्या किंमतीच्या मोबाईलचा शोध सायबर पोलीस स्टेशन मार्फत घेवुन ते मोबाईल संबंधीत व्यक्ती यांना देण्यात आले. तसेच सन २०२३ मध्ये एकूण ४९ मोबाईलचे वाटप करण्यात आले असुन अंदाजे किंमत एकुण ७.५० लाख रुपये एवढी आहे. व दिनांक ११/०४/२०२३ रोजी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा.यांचे हस्ते ३१ मोबाईल संबंधीत व्यक्तींना प्रदान करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख सा. अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी श्री. उल्हास भुसारी, पोउपनि श्री. निलेश ठाकरे, पोउपनि निलेश वाघ व पोलीस अंमलदार मनापोअं / ६३८ वर्षा वहिरवार, मनापोअं / २९१८ संगणी दुर्गे, मनापोअं/ गायत्री नैताम, मपोअं/ किरण रोहणकर, पोअं/ ५५५३ योगेश खोब्रागडे, पोअं/ सचिन नैताम यांनी पार पाडली.
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचेतर्फे जनतेला असे आवाहन करण्यात येत आहे की, सध्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असून, सायबर गुन्हेगारामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून फसवणुक केली जाते. त्यामुळे जनतेनी सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे व आपल्यासोबत काही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.