डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागात कार्यरत असलेल्या सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमकें हद्दीतील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या शिक्षणसह बौद्धीक कला-गुणांना पाय मिळावा, त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या विचारात बळ यावे व नक्षल विचारधारेकडे आकर्षीत होवू नये तसेच त्यांना जगत घडत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / प्रादेशिक / स्थानिक घडामोडी, शासकिय योजना इ. बाबत माहिती मिळावी व वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरीक्षेची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस दल मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतून “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम शुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत पोमके रेगडी परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व श्रमदानातून रेगडी येथे ऑनलाईन क्लासेस, प्रोजेक्टर रुम तथा स्पर्धापरिक्षा व ईतर अभ्यासाकरीता नवीन इमारतीमध्ये सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आली.
सदर वाचनालयाचे दिनांक १२/०४/२०१३ रोजी श्री. संदीप पाटील या. पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प, नागपूर यांचे उपस्थीतीत ऑनलाईन क्लासेस प्रोजेक्टर रूम व सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन झाले वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, सदरचे वाचनालय हे ग्रामिण भागात सुरु झाले असुन शहरात असलेल्या वाचनालयाइतके सुसज्ज असून वाचनालयाच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा शासकीय नौकरी मिळवून आपले व आपल्या गावाचे नाव उंचवावे.
पोलीस अधीक्षक श्री. नीलोयल सा. यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, जिल्ह्यात वाचनालयाची मोहिम राबवून जिल्ह्याची वाटचाल विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोमके रेगडीने आतापर्यंत माडेआमगाव, पोतेपल्ली व रेगडी अश्या ०३ ठिकाणी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केलेली आहे त्यांचे हे कार्य खुप चांगले आहे.
पोमके रेगडी येथे आयोजीत केलेल्या जनजागरण मेळाव्यात ६०० ते ७०० च्या संख्येने नागरीक उपस्थित असलेल्या जनतेचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने कार्यक्रमस्थळी उपस्थित महिलांना साड्यांचे व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. वाचनालयामध्ये स्वतंत्र्य अभ्यासिका, बैठक व्यवस्थेकरीता टेबल, चेअर, पुस्तके ठेवण्यासाठी कपाट व वाचनालयाकरीता पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
सदर लोकार्पण सोहळ्यास पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपुर श्री. संदीप पाटील सा., पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सतिश देशमुख सा., उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. प्रणील गिल्डा, व रेगडीच्या सरपंच मोहिता लेकामी तसेच रेगडी परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.
प्रस्तावना पोउपनि श्री. नंदकुमार शिब्रे, तर आभार प्रदर्शन पोउपनि राहुल विधोते यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. प्रणील गिल्डा, व पोमकें रेगडी प्रभारी अधिकारी पोउपनि श्री. नंदकुमार शिने व पोलीस अधीकारी, सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.