ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

चिमूर :- ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. हुमेश्वर आनंदे यांनी उपस्थिती लावली. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पुनम गेडाम तसेच सविता शेंडे व प्रा. डॉ. वरदा खटी उपस्थित होत्या.

          कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली.

          यावेळी पुनम गेडाम यांनी एमपीएससी परीक्षा आणि हुंडा पद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच हुंडा प्रथेविषयी आपले विचार मांडत विद्यार्थिनींना याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले.

           प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. वरदा खटी मॅडम यांनी महिलांच्या स्वावलंबनावर व भावनिक सामर्थ्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढली पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. हुमेश्वर आनंदे सर यांनी लिंगभेद समतेवर भर दिला आणि स्त्रीच्या यशस्वी वाटचालीसाठी पुरुषांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सरताज शेख यांनी केले, तर संचालन प्रा. श्रद्धा डोईजड यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. प्रणाली टेंभुर्णी यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला.