अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी :- आरमोरी तालुका स्थळापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोजबी व ग्रामपंचायत कोजबी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी कोजबी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. कविता ताडाम हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीनोत्त मुखर्जी मॅडम वैद्यकीय अधिकारी सामान्य रुग्णालय गडचिरोली , खोब्रागडे मॅडम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनटक्के सर, ब्राह्मणे मॅडम सी. एच. ओ. धोटे मॅडम , राऊत मॅडम शिक्षिका,पोलिस पाटील सौ. माधुरी साहारे, बुधराज गेडाम, गुलाब ताडाम, अश्विन बोदेले हे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सचिव ढोरे मॅडम, उपसरपंच प्रलय चहांदे,तथा संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य गण, दिनेश बनकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विनोद मानकर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, गुलाब जुमनाके, ग्रामपंचायत शिपाई मोरेश्वर सयाम, रोशन दुमाने ,सदाशिव शेंडे , भास्कर सयाम व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी रक्तदानाविषयी विविध प्रकारे मार्गदर्शन केले. व रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर रक्तदानाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. व या रक्तदान शिबिरात एकूण 21 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
रक्तदात्यामध्ये प्रकाश दूमाने, श्री. सोनटक्के सर, अश्विन बोदेले, गणेश मडावी, गणेश दुमाने, रितिक गेडाम, सुरेश फुकटे, अमित गेडाम, जगदीश कुमरे, बुधराज गेडाम, नागेश मसराम, सचिन मडावी, अनिकेत म्हशाखेत्री, जीवन मडावी, गुलाब ताडम, नितीन बोदेले ,जयंत चहांदे ,अरुण मडावी, प्रलय चहांदे, रोशन दुमाने ,टीकाराम दूमाने इत्यादींनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील शिक्षक श्री. प्रशांत ठेंगरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य केले.