प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
विविध प्रकारच्या कलाकारांसाठी कलाकार नोंदणी व मार्गदर्शन मेळावा १० मार्चला देसाईगंज-वडसा येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन ओम कलाकुंज कलाकार संघटना शाखा देसाईगंज वडसा व श्री. धनपालजी कार अध्यक्ष संगीत शिक्षक संघटना गडचिरोली यांनी केले होते.
कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनेभजनी कलावंत उपस्थित होते..या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.विजयभाऊ खरवडे -भारतीय जनसंसद गडचिरोली,श्री.पुंडलिकराव नागपूरकर-उपाध्यक्ष ओम कलाकुंज संघटना गडचिरोली,श्रीमती गयाबाई ठोंबरे मॅडम,श्री.उमेशजी हरशे -सचिव ओम कलाकुंज संघटना गडचिरोली हे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या प्रदेश कार्याध्यक्षा सारिका ताई उराडे चंद्रपूर यांनी कलावंतांच्या न्याय हक्क व मागण्या आणि वृद्ध मानधन योजना यावर विशेष मार्गदर्शन केले.
सारिकाताई बोलताना म्हणाल्या,अगर आपले न्याय व अधिकार मागितल्याने मिळत नसतील तर ते अधिकार आपन छिनुन घ्यायची तयारी असली पाहिजे.यावर कलाकार मेळाव्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी,आणि कलावंतांनी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीला जाहीर पाठिंबा दिला.
आणि गडचिरोली जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातून अखिल भारतीय न्याय हक्क समितीची धुरा सांभाळण्याची जिम्मेदारी हाती घेतली. अशाप्रकारे अखिल भारतीय कलावंत न्याय समितीचे वडसा देसाईगंज मध्ये नव्याने पदार्पण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर स्वागत गीताने करण्यात आली. आणि आभार प्रदर्शन शब्द सुमनाने करण्यात आले.