भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून गोर-गरीब, वंचीत वर्गाला जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करीन :- युवराज मामा पोळ यांचे उद्गार… — भीमशक्ती सामाजिक संघटना इंदापूर तालुक्याच्या वतीने नवीन पद नियुक्ती व सत्कार समारंभ…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         इंदापूर तालुक्याचा जानता राजा व प्रमुख मार्गदर्शक युवराज मामा पोळ अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना इंदापूर तालुका हे बोलत आसताना म्हणाले की सर्व कार्यकर्त्यांनी आता कामाला लागले पाहिजे.

             आपण कित्येक वर्षापासून काम करत आलेलो आहोत.आता त्या कामाची पोच पावती म्हणून आपल्याला येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये आपल्याला आपली ताकद निर्माण करायची त्यासाठी कार्यकर्त्यांनी गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता हा संकल्प केला पाहिजे. आपल्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता पूर्ण ताकतीने निवडणुकीमध्ये लढवण्यासाठी तयार आहे.आज आपण भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या इंदापूर तालुक्यामध्ये एकुण 67 शाखा झालेल्या आहेत.

          या इलेक्शन मध्ये आपला भीमसैनिक निवडणूक लढवून येणाऱ्या काळामध्ये आपल्या गोरगरीब शोषित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करेल तसेच आज माजी सामाजिक न्याय मंत्री संघर्ष नायक पॅंथर आयु. चंद्रकांतजी हंडोरे साहेब संस्थापक अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना, कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार संघटना वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आता सज्ज राहिले पाहिजे आसा आदेश त्यांनी दिल्यामुळे युवराज मामा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते.

          या कार्यक्रमासाठी,विजय नाना साळुंखे उपाध्यक्ष भीमशक्ती संघटना इंदापूर ता.नरसिंहपूरचे विद्यमान सरपंच नितीन सरोदे,आजोती ग्रुप ग्रामपंचायत सदस्य तुकाराम मिसाळ,शरद मखरे कार्याध्यक्ष इंदापूर शहर भीमशक्ती संघटना, पांडुरंग चौकीनाथ मिसाळ शाखाध्यक्ष बिजवडी,बाप्पू पोळ उपाध्यक्ष इंदापूर शहर भीमशक्ती सामाजिक संघटना राहुल बोबडे अध्यक्ष भीमशक्ती संघटना शाखाध्यक्ष रेडा,तानाजी कदम अध्यक्ष भीमशक्ती संघटना शाखा गिरवी दत्ता पवळ अध्यक्ष भीमशक्ती संघटना भोडणी, अख्तर शेख अध्यक्ष भीमशक्ती संघटना लुमेवाडी सुदाम मिसाळ उपाध्यक्ष भीमशक्ती संघटना आजोती अजय मोरे अध्यक्ष भीमशक्ती संघटना वनगळी,सोमनाथ चव्हाण कार्याध्यक्ष भीमशक्ती संघटना वनगळी ज्ञानेश्वर सूर्यवंशी उपाध्यक्ष भीमशक्ती संघटना वनगळी,अक्षय मोरे युवा उपाध्यक्ष इंदापूर शहर अंबादास काळे कुमार डाखूरकर उपाध्यक्ष वनगळी, संतोष घाडगे कल्याण घाडगे शशिकांत मिसाळ, भजनदास गायकवाड, संभाजी अण्णा मखरे, तुषार यादव कल्याण सोनवणे शिवाजी बापू जामदार,अजय ढोबळे,दादा लांडगे व इतर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.