
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा ही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे या यात्रेत हजारो भाविक येऊन श्री दर्शन घेऊन यात्रेत आनंद घेत असतात.
गोपाल काल्याच्या दिवशी विविध संघटना महाप्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करीत असतात त्यातून एक वेगळा भक्ती भावाचा आनंद मिळत असल्याची प्रतिक्रिया राका अजित पवार तालुका अध्यक्ष योगेश ठुणे यांनी सोशल मिडीयाशी बोलत असतांना व्यक्त केले.
नवीन बस स्टॉन्ड मासळ रोड कॉर्नर जवळ महाप्रसाद प्रसंगी पाहुणा आणि स्वत: वाटप करण्याचा प्रसंग आला असता राका अजित पवार चिमूर तालुका अध्यक्ष योगेश ठुणे यांनी सांगितले की महाप्रसाद कार्यक्रम विभिन्न मित्र मंडळी एकत्र येऊन एकोप्याने येऊन करीत असताना ग्रामीण भागातील भाविक यांना महाप्रसाद वाटप करीत असताना वेगळा आनंद मिळाला असल्याची प्रतिक्रिया दिली.