चक्क घरा समोर १६ चक्का ट्रक उभा ठेवून करतात ट्रक चालक – वाहक मुजोरी… — चिमूर पोलिस स्टेशन व चिमूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल..

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी  

चिमूर :- चिमूर शहरातील इंदिरा नगर येथील श्री.वसंत महादेवराव बावनकर यांच्या घरासमोर,एम.एच.३४ – बि.जी.२३४७ क्रमांकाचा १६ चक्का ट्रक उभा केला जातोय.उभा असलेल्या ट्रकमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना रहदारीस अडचण होत असताना चालक व वाहकच मुजोरी करीत असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. 

      ट्रक चालक व वाहक यांच्या मुजोरीला त्रासून श्री.वसंत महादेवराव बावनकर यांनी चिमूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व ठाणेदार चिमूर यांना अखेर तक्रार दिली आहे.

              एकदा ट्रक घरासमोर लावला तर दोन ते तीन दिवस ट्रक तिथून नेल्या जात नाही.त्यामुळे घरा समोरील जागा स्वच्छ करता येत नाही,तसेच घरी येणाऱे-जाणारे नातेवाईक किंवा इतरांना याचा त्रास सहन करावा लागतो.हा त्रास गेल्या एक महिण्यापासुन सतत होत आहे.

      ड्रायव्हर (चालक)- तळवेकर,हे नेताजी वार्ड चिमूर येथील रहिवासी असून,नेहरू शाळेच्या मागे राहतात.तद्वतच वाहक कानझोडे हे इंदिरा नगर,चिमूर येथील रहिवासी असून यांना घरासमोरुन ट्रक हटविण्याची वारंवार सुचना दिली. 

       परंतु तुला काय करायचे ते कर असे म्हणतात.आम्ही इथेच ट्रक ठेवू,आम्ही रोड टॅक्स देतो, आम्ही कुठेही ठेवू शकतो,अशा शब्दांत बोलतात व अरेरावी करतात.

       यामुळे चालक व वाहक यांच्या त्रास व धमक्या बघता नगर परिषद चिमूर व पोलीस स्टेशन चिमूर येथे श्री.वसंत महादेवराव बावनकर राहणार इंदिरा नगर,चिमूर यांनी तक्रार दिली.