![](https://www.dakhalnewsbharat.com/wp-content/uploads/2023/11/photo_2023-11-16_09-08-22.jpg)
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगांव (पि) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुलं मुली बुधवारी निसर्गमय वातावरणात रमले होते एक बुधवार बिनदप्तराचा हा उपक्रम राबविला जात आहे बिंनभितीची उघडी शाळा लाखों इथले गुरू झाडे वेली पशु पक्षी त्यांशी मैत्री करू असे म्हणत या शाळेचे विद्यार्थी मनसोक्त निसर्गमय वातावरणात आनंद घेतला.
यावेळी विद्यार्थी निरनिराळ्या शैक्षणिक व मैदानी खेळांचा मनसोक्त आनंद लुटला नंतर विद्यार्थी शिक्षक मिळून भोजनाचा आनंद घेतला.
याप्रसंगी जि.प.शाळेचे मुख्याध्यापक प्रेमानंद म्हसकर,जि.प.शाळेचे अध्यक्ष प्रकाश ढोक,ग्रामपंचायत सरपंच सरीता गुरनुले,उपसरपंच तुळसिदास शेरकुरे,ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गजभिये,सदस्य हपिज शेख,शिक्षक कर्मचारी,अगंणवाडी कर्मचारी,आदींची उपस्थित होते.