वरोरा सत्र न्यायालयातील भोंगळ कारभार आणला विनोदकुमार खोब्रागडे यांनी चव्हाट्यावर… — सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे केली वरोरा सत्र न्यायालय येथील न्यायाधीशांची तक्रार… — न्यायालयातील घटनाक्रम बेहद धक्कादायक!

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

      विनोदकुमार खोब्रागडे हे १ फेब्रुवारीच्या सुनावणीला उपस्थित नसताना उपस्थित असल्याचे दाखविण्यात आले व त्यांची सुनावणीला उपस्थित असल्याची बनावट स्वाक्षरी मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घटना अभ्यासक विनोदकुमार खोब्रागडे यांनी उघडकीस आलाय.

         तद्वतच आरोपी अँड.लक्ष्मन रामचंद्र पोले यांना नोटीस बजावली नसताना आरोपींना नोटीस बजावली असल्याचे दाखविण्यात आले आणि सुनावणी तारखेला आरोपी अँड.लक्ष्मन पोले हजर असल्याचे दाखविण्यात आले.हा वरोरा सत्र न्यायालयातील धक्कादायक प्रकार असून सामान्य नागरिकांचा विश्वास गमावणारा असल्याचे वास्तव आहे.

       चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत तथा वरोरा तालुक्यातील अनेक न्यायदंडाधिकारी,व न्यायाधीश अडाणी आहेत काय?असे विनोदकुमार खोब्रागडे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

    कायद्याचे पालन करणे हे न्यायाधीशांची सर्वात जास्त जबाबदारी आहे.

      चार चार सुप्रीम न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की,न्यायालयात सर्व काही आलबेल नाही?याचा प्रत्यय वरोरा येथील सत्र न्यायालयात विनोदकुमार खोब्रागडे यांना आलेला आहे.

         कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या विरुद्ध थेट कंन्टेम फौजदारी पीटिशन त्यांनी दाखल केली आहे.

        दाखल करनारे खुद्द संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,भारतीय संविधानाचे अभ्यासक राहणार वरोरा,जिल्हा चंद्रपूर हेच आहेत.

         ज्याअर्थी कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात फिर्यादी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी आरोपी अँड. लक्ष्मण रामचंद्र पोले यांचा विरुद्ध कंन्टेम फौजदारी खटला दिनांक १०/१२/२०२४ ला दाखल केला आहे.

       त्या खटल्यांमध्ये आरोपी अँड.लक्ष्मन रामचंद्र पोले यांचा विरुद्ध कोर्टाने नोटीस इशुच केले नाही व फिर्यादी यांनी आरोपींना पीटिशनची प्रत सुध्दा कोर्टात दाखल केली नाही.

        तरी सुद्धा वरोरा न्यायालयाने आरोपीला दिनांक ०१/०२/२०२५ रोजी कोर्टात सदर केस मध्ये हजर दाखविले व युक्तीवाद केला असेही रोजनामा मध्ये दाखविले आहे.

        खुद्द फिर्यादी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे हे संबंधित कोर्टात दिनांक ०१/०२/२०२५ ला उपस्थित नव्हते,तरी सुद्धा न्यायाधीशांनी विनोदकुमार खोब्रागडे यांनाही उपस्थित दाखविले.एवढेच नाही तर युक्तीवाद केला असेही रोजनामा मध्ये लिहिले,व साक्षरी केली?…

         यावरून सबंधित न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांचे कायद्याचे ज्ञान किती सुमार आहे हे लक्षात येते,तसेच निकाल पत्राचा दर्जाही सुमार आहे,म्हणून ते जनहिताच्या दृष्टीने अशा महत्त्वाच्या पदावर ठेवण्यास पात्र नाहीत,तात्काळ त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी फौजदारी कंन्टेम खटला मध्ये केली आहे.

*****

वरोरा ठाणेदार….

        दुसरीकडे त्याच वरोरा तालुक्यातील कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा येथे फिर्यादी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी श्री. विलास चव्हाण ठाणेदार वरोरा विरुद्ध फौजदारी कंन्टेम खटला क्रमांक ०१/२०१६ मध्ये दाखल केला होता,नोटीस इशु झाले,आजपर्यंत उत्तर दिले नाही,पुढील सुनावणी दिनांक १७/०२/२०२५ ला आहे…

****

जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि इतर अधिकारी….

        तसेच कोर्ट विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय वरोरा यांच्या न्यायालयात दिनांक १६/०८/२०१३ ला विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी फौजदारी खटला दाखल केला होता,तर संबंधित न्यायाधीश महोदय यांनी दिनांक १९/०७/२०१३ लाच तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर व इतर १९ आरोपी वर नोटीस इशु केले होते.

        फौजदारी खटला दाखल करण्यापूर्वीच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय वरोरा यांनी नोटीस इशु केलेच कसे?हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

*****

परभणी प्रकरण….

        परभणी प्रकरणात मुख्य आरोपी अशोक घोरबांड व इतर यांना नोटीस इशु झाले नाही,तर त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुढील सुनावणी दिनांक ०५/०३/२०२५ दिलीच कशी?

       असे अडाणी,कायद्याचे ज्ञान सुमार असलेले एक नाही तर अनेक न्यायदंडाधिकारी महोदय व न्यायाधीश महोदय मी स्वतः अनुभवले आहे,त्यांची गंभीर तक्रार मा.सरन्यायमूर्ती दिल्ली व मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांना केली आहे.

          माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.के.तातेड व न्यायमूर्ती देवधर यांच्या खंडपीठाने सांगलीचे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री.वसंत बावकर यांना सक्तीने घरी पाठविले आहे.

       त्याचप्रमाणे सबंधित न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय यांना सुद्धा घरी पाठवावे अशी फौजदारी कंन्टेम खटला अंतर्गत प्रार्थनेद्वारे केली आहे.

       मी कुठल्याही न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वरोरा यांचे नाव लिहीले नाही,व लिहिणे उचीत नाही असेही त्यांनी बातमी प्रकाशित करण्यासाठी पाठवलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे.

******

कायद्याचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक…

    एक लक्षात घ्या,आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही.

    म्हणूनच न्यायाधीश महोदय यांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.

       तसेच नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे.तद्वतच रोजनामा व्यवस्थीत लिहने आवश्यक आहे.

     फिर्याद काय आहे,त्यांचे लाईन टू लाईन वाचन करणे आवश्यक आहे.

      केस लाॅ चां संदर्भ,माननीय सुप्रीम न्यायालयाचे व माननीय उच्च न्यायालयाचे आदेश,निर्देश,जजमेंट,खटल्यात दाखल असल्याने त्यांचे जरुर अवलोकन करावे.

     आणि आदेश पारित करतांना योग्य ती कारणमीमांसा करावी, असेही विनोदकुमार खोब्रागडे यांचे म्हणणे आहे.

         अपील आहे म्हणून अधिकारी व न्यायदंडाधिकारी आणि न्यायाधीश यांनी थातुरमातुर आदेश पारित करुन आपली जबाबदारी झटकु नये.जनता,लोक,न्यायाच्या अपेक्षेने न्यायालयात व्यथित होऊन येतात,हे न्यायाधीश महोदय यांनी व अर्धन्यायीक अधिकारी यांनी लक्षात घ्यावे अशी विनोदकुमार खोब्रागडे यांची अपेक्षा आहे.

*****

जनहितार्थ जारी…

  समाजहितासाठी,देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी,लोकशाही बळकट करण्यासाठी,संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे…

धन्यवाद!

******

अपीलार्थी….

   संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,भारतीय संविधानाचे अभ्यासक,सामाजिक कार्यकर्ते,लोकसेवक तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते राहणार वरोरा,जिल्हा चंद्रपूर….

— ९८५०३८२४२६…

— ८३२९४२३२६१..