
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- प्रबोधनकार क़ला साहित्य संघाच्या वतीने पिंडकेपार येथील जागृत श्रीराम मंदिर संस्थानचे भव्य पटांगणात दोन दिवसीय विदर्भस्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन येत्या १६ व १७ फेब्रूवारी २०२५ रोजी करण्यात येत आहे. यावेळी विविध लोककलांचे सादरीकरण, कवि संमेलन व संगीत त्याग या नाटकाचे देखील आयोजन केले आहे.
उदघाटक म्हणून समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, संमेलनाध्यक्षपदी क्रीडाअधिकारी ए. बी. मरसकोल्हे तर स्वागताध्यक्ष म्हणून दिलीप बिसेन उपस्थित असतील.
विशेष अतिथी म्हणून सभापती मदन रामटेके, पद्मश्री डाॅ. परशुराम खुणे तर विशेष आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री मिनाक्षी पाखरे व अभिनेता राजेश चिटणीस उपस्थित असतील.
अतिथी म्हणून तहसिलदार निलेश कदम, पो.नि. महादेव आचरेकर, जि.प.सदस्या दिपलता समरीत, संघटनेचे अध्यक्ष कमलेश पाटील, पं.स.सभापती ललित हेमने, सरपंच नंदकिशोर समरीत, उपसरपंच माणिक कापगते, वलमाझरीचे सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे , पं.स.सदस्य सरीता लंजे, सुशिल गणवीर, सभापती चेतन वडगाये, राकेश वालदे, परमानंद गहाणे, नरेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, संघटनेचे जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले, मनोज कोटांगले, पो.पा.प्रमोद भोयर, तं.मु.अध्यक्ष शिवचरण वडीकार, अंगराज समरीत, शीलकुमार वैद्य, लक्ष्मण हारगुडे, मुख्या. राजेश सूर्यवंशी, प्राचार्य अमोल हलमारे, उमाजी बिसेन आदी उपस्थित असतील.
यावेळी कलाक्षेत्रातील अनेक विभूतींचा सत्कार केला जाईल तसेच मराठमोळी लावणी, राष्ट्रीय संगित खडा तमाशा, गोंडी गीत, कीर्तन, कव्वाली, आर्केष्ट्रा, नाट्यसंगीत, एकपात्री अभिनय, कलापथक, अंधश्रद्धा निर्मूलनपर जादूचे प्रयोग, दंडार, भजने सादर होतील. रात्री संघटनेच्या वतीने संगित त्याग या नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल.
दुसर्या दिवशीच्या सत्रात पुन्हा उपस्थित लोककलावंतांच्या कलांचे सादरीकरण व नंतर कवीसंमेलनाचे आयोजन होईल.
समारोपिय कार्यक्रमाप्रसंगी जि.प.सदस्या माहेश्वरी नेवारे, पं.स.सदस्य होमराज कापगते, डाॅ.वसंतराव बाळबुद्धे, भूमाला उईके, सिनेस्टार कृपाल लंजे, सर्व ग्रा.पं.सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने भावेश कोटांगले, मनोज कोटांगले, राकेश वालदे, धनंजय धकाते, उमेश भोयर, बालू भुजाडे, संजय टेंभूर्णे आदींनी केले आहे.