
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि शिक्षण विभागामार्फत ग्रंथोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
त्याअनुषंगाने, गडचिरोली ग्रंथोत्सवाचे आयोजन दि. 13 व 14 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल सभागृह, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे करण्यात आले आहे. सदर ग्रंथोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सह पालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी कळविले आहे.
ग्रंथोत्सवाचा शुभारंभ 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथोत्सव व ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन स.11 वाजता होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या आयोजनानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री तसेच विविध साहित्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
यामध्ये भारतीय संविधानावर परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम व 14 फेब्रुवारी रोजी आजचा वाचक आणि ग्रंथालये, मराठी भाषा अभिजीत भाषाः उगम आणि उत्कर्ष यावर परिसंवाद व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.