सैय्यद ज़ाकिर
जिल्हा प्रतिनिधी वर्धा
हिगणघाट :— राज्य विद्युत वितरण कंपनी हिगणघाट येथील साहाय्यक अभियंता अंकुश रामाजी चहांदे हे,विधुत ग्राहक क्रमांक – 396320001022 अन्वये श्री.हिम्मत ध्रुवप्रसाद रेवते रा.शाहलगड़ी यांचे घरगुती विज बिल थक्कीत असल्यामुळे त्यांच्या घरचा विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी १० फेब्रुवारीला गेले असता संबंधित विद्युत ग्राहकांनी त्यांना मारहाण केली असल्याचे गंभीर प्रकरण घडले.
माहे आक्टो 2023 ते डिसेम्बर 2023 पर्यतचे एकूण 1 हजार,चारशे 10 रुपये थकित बिल असल्याने,बिल न भरल्यामुळे हिम्मत ध्रुवप्रसाद रेवते यांचे घराची लाईट कट (बंद) करण्याकरिता दुपारी 2:30 वाजता त्याचे घरा समोर जाऊन आवाज दिला.
श्री.हिम्मत रेवते घराबाहेर आले,त्यांच्यावर असलेल्या थकित बिल भरण्या करिता असे सांगण्यात आले.परंतु रेवते म्हणाला की पांच-स हा दिवसानी बिल भरतो आहे असे म्हणाले.
या अगोदर सुद्धा त्याला विज बिल भरने बाबत सूचना दिली,परंतु तो याच प्रकारे वेळकाढूपणा करीत असल्याने त्याचे घराचे बाहेरील भीतिला लाऊन असलेला मीटर मधील विधुत कनेक्शन कापत असताना श्री.हिम्मत रेवते यांनी अश्लील शिवीगाळ दिली आणि विद्युत कर्मचाऱ्यांची कॉलर पकडूंन ओडत नेले व हाता -बुक्यानी मारहाण केली.
त्यामुळे फिर्यादिच्या छाती वर नखाचे ओरपडे आले.हिम्मत रेवते रा. शाहलगड़ी याने शासकीय कामात अडथळा निर्माण करुन व अश्लील शिविगाड़ करुन मारहाण केल्याने हिम्मत रेवते यांच्या विरुद्ध हिगणघाट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.