कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी : पारशिवनी तालुक्यातील वेगवेगळ्या सहा केंद्रांवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. १२) शांततेत पार पडली. तालुक्यातून एकूण ९३६ परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. उर्वरित ३२ विद्यार्थी वेगवेगळ्या कारणांमुळे परीक्षेला गैरहजर होते.
पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. इयत्ता पाचवी व आठवी साठी तालुक्यात पारशिवनी
येथिल केसरीमल पालीवाल विद्यालय, हरिहर विद्यालय, राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी, कन्हान येथील नारायण विद्यालय विवेकानंद नंगर, बळीराम दखने हायस्कुल रायनगर , नुतन सरस्वती विद्यालय टेकाडी या सहा केंद्रांवर ९३६ पैकी ९०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ३२ परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच इयत्ता आठवी करिता तालुक्यातील सहा ही केंद्रांवर एकूण ३३४ पैकी ३२२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. १२ विद्यार्थी मात्र गैरहजर होते. इयत्या पाचवी करिता ६०२ पैकी ५८२ विद्यार्थी परिक्षेला सामोर गेले .२० विद्यार्थी गैर हजर होते पारशिवनी तालुकाचे सहा ही केन्द्रात एकूणच इयत्ता पाचवी व आठवीच्या एकूण ९३६ पैकी ९०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
गटशिक्षणाधिकारी वदना हटवार विस्तार अधिकारी कैलाश लोखडे लता माळोदे केंद्रप्रमुख सह शिक्षक यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी देत पाहणी केली खेड्यापाड्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी आपल्या पालकांसोबत तर काही शिक्षकांसोबत आल्याने परीक्षा केंद्राबाहेर कुठे झाडाखाली तर कुठे खुल्या आवारात पालक व शिक्षक तासनतास बसून होते.