दिक्षा कऱ्हाडे

     वृत्त संपादिका 

       शुभम राजेंद्रप्रसाद भगत म्हणजे सातत्याने धडपडणारे संघर्षमय व्यक्तित्व व विनयशील स्वभावाचे चालतेबोलते सामाजिक चित्र!

     त्यांनी सामाजिक क्षेत्राबरोबरच अभिनयाच्या क्षेत्रात छाप पाडून आपली आगळीवेगळी ओळख अख्या महाराष्ट्र राज्यात केली.अशा या संवेदनशील शुभम भगतचा अच्यानक झालेला मृत्यू अनेकांच्या मनाला चटके लावून गेला.

           शुभम लहान असतानाच वडील राजेंद्रप्रसाद भगतचा मृत्यु झाला. कुंटूबाला सावरत त्या लहान वयात शुभमने वर्तमानपत्र वितरण करून आपली उपजिवीका करत लहान बहिन चिवूचे शिक्षणासाठी चंद्रपूर गाठले तिथे त्यांनी काही दिवस मोलमजूरी केली. 

       मात्र अंगात कला होती,कलेची कदर कुठेतरी झाली पाहीजे यासाठी धडपड करीत असताना अशातच चंद्रपूर येथील मराठी पिक्चरच्या निर्मात्याशी भेट झाली.या भेटीतुनच शुभमच्या जिवणाला कलाटणी मिळाली. 

       “हद एक मर्यादा,या फिल्म मध्ये काम करण्याची संधी मिळाली,त्यात त्यांनी गोपालची भूमीका सादर केली. त्यानंतर शुभमने मागे वळून पाहीले नाही.त्यांनी अनेक पिक्चरच्या मुवीज वेब सीरीज मध्ये आपल्या विवीध अभिनयाची छाप सोडली.

         नुकतेच मुंबई येथे गगन फाऊंडेशनच्या वतीने उत्कृष्ठ अभिनेता म्हणून सत्कार करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी व चिमूर येथील संविधान सन्मान दिन समारोह समिती च्या वतीने संविधान दिन कार्यक्रमात सत्कार व ३१ जानेवारी २०२३ ला चिमूर तालुका प्रेस असोशिएशन च्या वतीने शालेय समूह नृत्य स्पर्धा सांस्कृतीक कार्यक्रमात चिमूर क्रांती भूषण पुरस्कार देन्यात आला. 

        परिस्थितीला चांगले दिवस आले असताना शुभमचा अचानक रविवारला मृत्यु झाला ही दु:खद् घटनाच!

        उमा नदीच्या स्मशान भुमीत शुभमच्या मृत्यू देहाला आज चिताग्नी देण्यात येणार आहे.त्याच्या अंतिम यात्रेत जनसागर उसळणार असल्याची दाट शक्यता आहे.मात्र त्यांचा मृतदेह बघताना अनेकांची मने गहिवरून आली होती.

         शुभम,आई व बहिणीचा एकमेव आधार होता.तो आधार हरपल्याने त्यांच्यावर आयुष्यभराचा आघात झाला आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com