युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
नवविवाहीत पत्नीला आपल्या दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना दोन दुचाकींची समोरसमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात नवविवाहीतेचा पती गंभीर जखमी झाला असून नवविवाहिता सुखरूप आहे हि घटना खल्लार पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगाव फाट्यावर काल दि 12 फेब्रुवारीला रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली.
राजु पटके रा घडा(सांगवा)असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून राजु पटके याचे लग्न काल दि 12 फेब्रुवारीला दारव्हा येथे पार पडले लग्नानंतर राजू पटके हा आपल्या नवविवाहित पत्नीस दुचाकीवरून घरी घेऊन येत असतानाच रामगाव फाट्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात राजु गंभीर जखमी झाला
या घटनेची माहिती शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांना माहीत होताच त्यांनी खाजगी वाहनातून जखमीस उपजिल्हा रुग्णालय,दर्यापूर येथे आणले मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यास अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
खल्लार पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातातील दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या या अपघातातील दुचाकीस्वार हे एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली असुन याप्रकरणी खल्लार पोलिस स्टेशनला कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही.