शासकीय योजनांची माहिती देणारी व योजनातंर्गत कामे निकाली काढणारी जत्रा संपन्न.. — १७ व १८ में ला पारशिवनी येथे जत्रेचे आयोजन..

 

  कमलसिंह यादव

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी नागपूर.. (पारशिवनी)

पारशिवनी :-

     मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यात चालविलेल्या सर्व शासकीय योजनांची माहिती व लाभ तळागाळातल्या लोकांना पोहोचविण्याकरिता मुख्यमंत्री शासकीय योजनां गतिमान अमल बजावणी अभियान अर्तगत शासकिय जत्रा, योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी या योजनेंतर्गत शिबिराचे आयोजन उपविभागीय अर्तगत पारशिवनी तहसिल कार्यालय तर्फे(१) नवेगाव खैरी येथे ३ व ४ मे रोजी संपन झाले.

        शिविरात क्षेत्रातील नवेगावखैरी,पाली उमरी, नेऊराज,बिटोली,सालई माहुली,कालभैरव,भुलेवाडी, परसोडी,पेठ,कोडासावली,आवलेघाट,चारगांव,बच्छेरा,पालासावली, आमगाव सह जवळ पासचे गावातील शेतकरी,विद्यार्थी,महीला,पुरुष,व जेष्ठ नागरिकांनी शिविराचा लाभ घेतला.

       तसेच दुसरा टप्प्यात (२) तालुक्यात करंभाड येथे १० व ११ मे, ला सपन्न झाले.शिविरात तालुक्यातील करभाड येथे दुसरे शिविर दोन दिवसिय शासकिय जत्रा शिविरचा दुसऱ्या टप्प्याचा प्रारभ बुधवार,१० मे रोजी करण्यात आला. 

          शिबिर बुधवार १० ते गुरुवार ११ मे पर्यंत असे दोन दिवसीय शिविर करंभाड येथे शाळेचे पटागणात संपन्न झाले.या शिविरात भागघेणारे गावामध्ये करंभाड,भागीमहारी,पेठरी,कुसुमधरा,सकरला,कान्हादेवी,निबां,महादुला,दहेगाव जोशी ,खंडाळा मरियम,पारडी,बाबुलवाडा,सालई मोकासा,सह जवळ पासचे गावातील नागरिक,जेष्ठ नागरिक, शेतकरी,महिला,पुरुष,विद्यार्थी यांनी उपस्थित राहुन शासकिया योजनाचा लाभ घेतला.

        शिबिराचे विधिवत उद्घाटन बुधवार दिनाक ११ मे २०२३ ला पारशिवनी तालुक्यातील ग्रा.पं.करंभाड येथे शासन आपल्या दारी या अंतर्गत झाले तर “योजना जनकल्याणकारी..सर्वसामान्यांच्या दारी ” या उपक्रमाचे उदघाटन 

करंभाड येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे १० मे रोजी आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य सौ. अर्चना दिपक भोयर यांच्या हस्ते झाले.

       यावेळी पंचायत समिती सभापती मंगलाताई उमराव निंबोणे,पंस सदस्य संदीप भलावी,जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधाकर मेंघर,करभाड ग्राम पंचायतीच्या सरपंच भुवनेश्वरी भुरसे,उपसरपंच विजय उपासे,नायब तहसीलदार आर. जी. आडे,नायब तहसिलदार रणजित दुसावार,जिल्हा परिषद शोळेतील मुख्याध्यापिका एन. सी. मस्के, सामाजिक कार्यकर्ते दीपक भोयर, गोपाल गजभिये, राजेंद्र भागडकर, दहेगाव जोशी ग्राम पंचायतचे सरपंच पवन बोंद्रे, उपसरपंच भूपेंद्र तांदूळकर, यांच्यासह संबधित गावातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

      कार्यक्रमाचे संचालन शिक्षक राजेंद्र उबाळे सर यांनी केले.

राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. शासकीय योजनांपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी हा उपक्रम राज्यात शासकीय स्तरावर सुरू

करण्यात आला.

       घरकूल पूर्णत्व प्रमाणपत्र देणे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचविणे हा उद्देश जत्रा कार्यक्रमामागचा आहे.

      सर्व योजना,बीज जोडणी,निराधार योजना,वन विभाग,आरोग्य विभाग,पशुवैद्यकीय विभाग,कृषी विभाग,शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,महशुल विभागा,घरकुल विभाग,बचतगट विभागचे स्टाॅल लावण्यात आले होते.तसेच आधार अपडेट,चरित्र प्रमाणपत्रासह सर्व योजनाची माहीती देऊन कामे करण्यात आली. 

        तालुक्याचे पाच शिविर संपल्या नतर शेवटी २ जून २०२३ ला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, सिंचन, तालुक्यातील अनेक मंडळांत जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी प्रमाणपत्र सर्व प्रमाण पत्र तयार करून वाटप करून उपक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.

         शिबिराचा तिसरा टप्पा पारशिवनी येथिल दिनांक १७ मे व १८ मे रोजी जिल्हा परिषद बेसिक शाळा पारशिवनी येथे होणार असून श्रेत्रातील नागरिकानी यांश शिविराचा लाभ ध्यावा असे आव्हान तहसिलदार प्रशात सांगड़े यानी केले आहे.

         अशी प्रत्येक विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी आपल्या चमूसह येणारी कामे पार पाडली.यामध्ये अन्नपुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना विभाग , तहसील कार्यालय सेतू विभाग , निवडणूक विभाग , पंचायत समिती पारशिवनी कृषी विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा विभाग ,भूमी अभिलेख कार्यालय पारशिवनी, या शासकीय कार्यालयाने आपली उपस्थिती या शिबिराला दर्शवून या शिबिरात अनेक गरजूंना अनेक योजनांचा लाभ मिळविण्याकरिता मदत केली व लाभही मिळवून दिला.

         शिबिराला उन्हाचा तडाका बसला असल्या तरी पाहिजे त्या प्रमाणात या शिबिराला प्रतिसाद मिळाला. गोरगरिबांना व गरजूंना शासकीय कार्यालयीन कामाकरिता पारशिवनी येथील तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे या शिबिराचे आयोजन करभाड येथे १० ते ११ मेपर्यंत दोन दिवस चालणार्‍या या शिबिरात गरजूंनी आपली कामे याच ठिकाणी करून घेतली व पारशिवनी, आमडी, कन्हान येथे होणारे जत्रा शासकिय शिवीराचे लाभ घेण्याचे आवाहन पारशिवनी येथील तहसिलदार पंचायत समितीचे खंड विकास आधिकारी सुभाष जाधव यांनी केले.

        तरी शिबिरात कुणाला काही अडचणी आल्यास त्या तत्काळ सोडविण्यात येईल,असे तहसीलदार,बि.डि.ओ यांनी सांगितले.

       शिबिरामधील प्रत्येक कार्यालयाच्या विभागात जाऊन शिबिराचा दोन्ही दिवस सुरळीतपणे पार पाडण्यात राजस्व निरीक्षक व नायब तहसिलदार व सर्व विभाग प्रमुखानी यांनी मोलाची भूमिका बजावली. .