युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
नागरिक हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड संतोषजी कोल्हे यांच्या नेतृत्वात थिलोरी येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी नागरिक हक्क संरक्षण समिती थिलोरीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनतर समितीचे ध्येय व उद्दिष्ट ॲड संतोष कोल्हे यांनी कथन केले व शेवटी ग्राम थिलोरीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी थिलोरीच्या अध्यक्षपदी प्रा.अनिरुद्ध होले, उपाध्यक्ष कैलास थोरात, कोषाध्यक्ष सुभाष बनसोड, सचिवपदी इंजी अनिकेत वाकपांजर, सदस्य पदी ऋषिकेश होले,बाळु भाऊ वाकपांजर,अनिकेत सुरपाटने, गजानन होले, निखिल वाकपांजर, गणेश टापरे,बाळकृष्ण वाकपांजर, शुभम बावनेर यांची नियुक्ती करण्यात आली.