रासेयो शिबीरात गायञी प्रधाने हीचा सत्कार… — राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे सुयश…

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

             मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलना करीता राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकामध्यें भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालीत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावली येथील बि.एस्सी.द्वितीय वर्गाची विद्यार्थीनी गायत्री संजय प्रधाने हीची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत निवडलेल्या पथकामध्यें निवड झाली आहे.

             १७ ते २६ जानेवारी दरम्यान मुंबई येथे होणाऱ्या दहा दिवसीय शिबीरात सदर विद्यार्थीनी सहभागी होणार आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक ५ ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पंजाब राज्यातील चंदीगड येेथे होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबीरा करीता गायत्री संजय प्रधाने हीची निवड झाली आहे.

              राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथक संचलन आणि चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबीराकरीता निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने गायत्री प्रधाने हीचा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कवठी येथे पार पडत असलेल्या शिबीरात संस्थेचे उपाध्यक्ष अनिल स्वामी, कोषाध्यक्ष डाॅ. विजयराव शेंडे आणि प्राचार्य डाॅ. चंद्रमौली यांचे हस्ते सत्कार करण्यांत आला. यावेळी कवठी ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठया संख्येनी उपस्थित होते.