
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
१२ जानेवारी रोज रविवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास भिसी येथील एका वासनांध नराधमाने खाऊचे आमिष दाखवित १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पडक्या घरात नेले व सदर मुलीवर अतीप्रसंग केला असल्याची गंभीर घटना भिसी येथे घडली.
अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अरविंद हरीदास नगराळे रा.भिसी वय ४० वर्षे यांने दुपारी २:३० ते ३:३० वाजताच्या दरम्यान बाजार चौकातील लव धांडे यांच्या पडक्या घरात अल्पवयीन पिडीत मुलीला खाऊ देतो म्हणुन नेले व लैंगिक अत्याचार केला.
अत्याचाराची गंभीर घटना गावातील नागरीकांना माहित होताच नागरिकांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली.नागिरिकांचा अत्याचार घटने बाबत आक्रोश बघता पोलीस प्रशासनाने वेळीच त्यांना शांत केले.
या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे नेते डॉ. दिलीप शिवरकर,स्वप्नील गाडीवार,रविन्द्र लोहकरे,निलेश गभणे,कॉग्रेसचे नेते अरविंद रेवतकर,सचीन गाडीवार यांनी प्रकरणाची दखल घेत ठाणेदार यांची भेट घेतली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
मात्र,मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध अप.क्रमांक 04/25,कलम 64, 64 (2) (1),64 (2) (J) ,65 (2), बि.एन.एस.सह कलम 4,8 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भिसी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पाटील या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.