चिमूर तालुक्यातील मौजा महादवाडी-हरणी नदी घाटावरुन होणाऱ्या अवैध वाळू उत्खननाकडे तहसीलदार,तलाठी यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष! — महादवाडी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अमोल एकनाथ भागडे यांचा लेखी तक्रार अर्जाद्वारे गंभीर आरोप… — दररोज २५ ट्रक्टरटाली वाळूचे अवैध उत्खनन..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

         महादवाडी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोल एकनाथ भागडे यांनी चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांना अवैध वाळू उत्खनन संबंधाने तक्रार दिली आहे.

      सदर तक्रारीत दररोज २० ते २५ ब्रास वाळूचा उपसा,वाळू चोर करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

          तक्रारीत म्हटले आहे की,मागील १ वर्षापासून (२०२४-२०२५) उमा नदीच्या महादवाडी-हरणी घाटावरून दररोज रात्रो व दिवसा दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैद्य पद्धतीने साधारण २० ते २५ ट्रॅक्टर ट्रालीद्वारे दररोज रेतीची तस्करी केली जात आहे.

        याबद्दल वेळोवेळी गावक्षेत्राचे तलाठी,चिमूर तहसीलदार यांना रेती तस्करी संदर्भात पत्राद्वारे कळविण्यात आले होते व रेती तस्करी करणाऱ्यांना सुद्धा रेती तस्करी संदर्भात तोंडी सूचना केली होती असे तक्रार अर्जात नमूद आहे.

       परंतु अवैध वाळू उपसा प्रकरणाकडे सर्वांनी दुर्लक्ष करून नेहमी प्रमाणे आवैद्य रेतीची तस्करी सुरूच ठेवली आहे.

       अवैध वाळू उत्खननातंर्गत घटना श्री.अमोल एकनाथ भागडे महादवाडी यांनी पाहली आणि ट्रॅक्टर ट्राली (स्वराज-७४४ एफ ई निळी) रेतीने भरून असलेली अडविण्याच्या हेतूने रस्त्याला आडवी बैलबंडी केली असता रेती ट्रॅक्टरच्या समोर-समोर दुचाकीने असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळताच रेती भरून असलेली ट्रॅक्टर रोजच्या रस्ताने न नेता मार्ग बदलवून महादवाडी गावच्या वस्तीतून भरधाव वेगाने नेण्यात आली. 

       ही घटना अमोल भागडे यांनी स्वतः गावचे सरपंच यांना रात्रो २.३० ते ३.०० वाजता दरम्यान फोनद्वारे वाॅटसपवर कळविली असता रेती भरून असलेली ट्रॅक्टर ट्राली ग्रा.पं च्या सी.सी टीव्ही मध्ये चित्रित झालेली दिसले आहे.

        यामुळे घटनेची सखोल चौकशी करून अवैद्य रेती तस्करांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे आणि ट्रॅक्टर ट्राली चालक व मालक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही शासन स्तरावर करणे गरजेचे आहे असे तक्रार अर्जात म्हटले आहे.

       अर्जदारांनी म्हटले आहे की मला व लोकांना होणारा नाहक त्रास,तसेच प्रशासनाचे बुडणारे महसूल या पासून सुटका मिळेल.

***

बाॅक्स..‌

        सदर घटना ग्रा.प. महादवाडी यांच्या सी.सी.टीव्ही कॅमेरात फक्त सहा ते सात दिवस जमा असते,यामुळे लवकरात लवकर चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे अर्जदार अमोल भागडे यांचे म्हणणे आहे.सदर अर्ज चिमूर तहसीलदार यांना १० जानेवारीला दिला आहे.