सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
ग्राम बोथली येथील आरोपी बंडू कवडू पुल्लावार ह्याचे त्याचे पत्नी वंदना सोबत व मुलगी अंकिता सोबत पटत नव्हते. तो परिवारापासून वेगळा राहत होता. दिनांक ०४/०५/२२ रोजी वंदना पुल्लावर यांची मोठी मुलगी मोनाली हिची सासू शकुंतला नंदमवार ही काही कामा निमित्त बोथली येथे मुक्कामाने अली होती.
सदर दिवशी रात्री अंदाजे ११:३० वाजता दरम्यान वंदना, मुलगी अंकिता व शकुंतला नंदमवार असे झोपले असतांना आरोपी बंडू पुल्लावार ह्याने घरात प्रवेश करून स्वतःची पत्नी वंदना समजून शकुंतला नंदमवार हिच्या डोक्यावर लोखंडी सब्बल ने वार केले तसेच अंकिता ला सुद्धा जखमी केले.उपचारादरम्यान शकुंतला नंदमवार ही मरण पावली.
फिर्यादी कु अंकीता पुल्लावार हिचे डीडी बयानावरून पो स्टे सावली येथे अपराध क्रमांक १०४/२२ कलम ३०७,३२५,३०२ भा द वी अन्वये गुन्हा नोंद केला.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन ठाणेदार आशिष बोरकर यांनी स्वतःकडे घेऊन आरोपीला अटक करून व तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर येथे सदर गुन्ह्याचा खटला सुरू होता.
दिनांक १३/०१/२५ रोजी मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रपूर श्रीमती भीष्म मॅडम यांनी आरोपी बंडू कवडू पुल्लावार ह्याला कलम ३०२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.तर कलम ३२५ भा द वी मध्ये ३ वर्षे कारवासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर खटल्यात श्री प्रशांत घट्टूवार यांनी युक्तिवाद केला तर कोर्ट पैरवी म्हणून सपना बेल्लावार यांनी कामकाज पाहिले.सदर गुन्ह्याचा तपास सावली पोलिस स्टेशन चे तत्कालीन ठाणेदार श्री.आशिष बोरकर यांनी केला.