
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी तालुकातंर्गत आामगाव शिवारात १२ जानेवारला सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास शेतकरी सहादेव नत्थुजी सुर्यवंशी वय ४३ वर्ष यांच्यावर वाघाने जिवघेणा हल्ला केला.त्या हल्ल्यात सदर शेतकऱ्यांचा मूतृ झालेला आहे.
पारशिवनी वनपरिक्षेत्रातील आमगाव या गावातील शेतकरी शेतामध्ये तुरीची कापणी करत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सदर शेतकऱ्यांवर हल्ला चढवला व त्या हल्यात शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत आपल्या वनकर्मचाऱ्यासह घटना स्थळी दाखल झाले.
पारशिवनी ठाणेदार राजेशकुमार थोरात सुध्दा आपल्या पोलिस ताफ्यासह घटना स्थळी दाखल झाले होते.
पारशिवनी क्षेत्रातंर्गत ग्रामीण भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाघाचा मुक्त संचार वाढल्याने व पाळीव प्राण्यांची शिकार करून आजपर्यंत आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या वाघाने आता माणसाला भक्ष्य केले आहे.यामुळे शेतकरी शेतमजूर हे दहशतीत आले आहे.
दोन दिवस आधी सालई या गावातील शेतकऱ्यांच्या गाई ला वाघाने ठार केले.तर काही महिन्यां अगोदरच एका शेतकऱ्यास वाघाने जबर जखमी केले होते.पण आजच्या घटनेत वाघाने शेतकऱ्यांच्याच नरडीचा घोट घेतला.
आता वाघ हा नरभक्षी झालेला असल्यामुळे सदर वाघाचा कायम स्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत असे शेतकरी भुजंग ढोरे म्हणाले.