युवराज डोंगरे-खल्लार
उपसंपादक
नजिकच्या बेंबळा बु.येथील हिंदू स्मशानभूमीचे भूमिपूजन दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते १२ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास पार पडले.
हिंदू स्मशानभूमीसाठी आमदार निधीतून ५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी दर्यापूर तालुका काँग्रेस कमीटीचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे,काँग्रेस तालुका सेवादल अध्यक्ष नानाभाऊ धाबे,बेंबळा बु.चे सरपंच सलिम पठाण,उपसरपंच गजानन शिंगणे व ग्रा.पं. सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते.