आपल्या भारताचा गेल्या 16,000 वर्षांचा इतिहास लिहिण्यासाठी सरकारने एक 16 सदस्यीय समिती नेमली आहे.
हे 16 लोक हा 16,000 वर्षांचा इतिहास लिहिणार आहेत.
ते 16 ही लोक फक्त पुरुष आहेत.
(त्यात एकही महिला नाही)
ते 16 ही पुरुष सदस्य ब्राम्हण आहेत..
ते 16 ही सदस्य उत्तर प्रदेशातीलच ब्राम्हण आहेत..
(त्यात इतर राज्यांमधील एकही सदस्य नाही, इतर राज्यातील ब्राम्हणही नाही)
या 16 सदस्यांमधील 8 सदस्य संस्कृतचे तज्ञ आहेत.एकही पाली भाषेचा तज्ञ नाही,पुरातत्व खात्याचा तज्ञ नाही.
(मा.संजय सोनवणी यांच्या आजच्या अकोल्यातील व्याख्यानातून)
हा इतिहास 2024 पासून आपल्या मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात शिकविला जाईल.म्हणजे भविष्यात या भारतातील आपल्या मुलांनी काय शिकावं?
हे उत्तर प्रदेशातील 16 ब्राम्हण ठरवणार आहेत.देशात इतर कोणत्याच जाती धर्माचा माणूस त्या लायकीचा नाही असे सरकारचे म्हणणे आणि मानने आहे.
स्वतः ला ओबीसी म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधानांनाही ओबीसी मधील कुणीच त्या लायकीचे वाटत नाही हे विशेष. (याठिकाणी दुसऱ्या कुण्या एकाच जातीचे लोक घेतले गेले असते तर? )
पुढील पिढ्यांचे भविष्य काय असेल? हे आजच तुमच्या लक्षात येऊ शकते.
अजून किती भेदभाव करणार आहेत हे? आणखी किती द्वेष पेरणार आहेत हे? कधी आणि कुठे थांबणार आहेत हे लोक?
बेरोजगारी,गरिबी आणि मागासलेपणात सुख मानणारी तसेच अन्यायाला न्याय म्हणणारी पिढी घडवीत आहेत हे लोक..
अर्थात हे सर्व घडेल जर हे लोक पुन्हा निवडून आले तरंच.. माणूस म्हणून सुखाने आणि समानतेने जगण्यासाठी पुन्हा हे लोक सत्तेत येऊ नये हाच एक शेवटचा पर्याय आपल्या भारतीय नागरिकांपुढे उरला आहे…