कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान – कन्हान येथे रामकृष्ण मठ , बळीरामजी दखने हायस्कुल , धर्मराज विद्यालय , बीकेसीपी शाळा , आदर्श हायस्कुल आणी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती चे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्व प्रथम बीकेसीपी शाळेत मुख्याध्यापिका सौ.के.एस.नाथ आणि रामकृष्ण मठ स्वामी गुणदानंद महाराज , स्वामी ब्रम्हानंद महाराज यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन विविध शाळेच्या विद्यार्थांची जनजागृती रैली काढण्यात आली . रैली मध्ये विद्यार्थींनी लेझिम चे प्रदर्शन करुन रैली राष्ट्रीय महामार्गा ने गांधी चौक , आंबेडकर चौक , तारसा चौक , सात नंबर नाका होऊन बळीरामजी दखने हायस्कुल येथे रैलीचे समापन करण्यात आले . त्यानंतर बळीरामजी दखने हायस्कुल येथे समापन समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सौ विशाखा ठमके , प्रमुख पाहुणे रामकृष्ण मठ चे स्वामी गुणदानंद महाराज,प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिति सौ.एल एस माळोदे सह आदि मान्यवरांचा हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात केली.
यावेळी बळीरामजी दखने हायस्कुल च्या विद्यार्थांनी स्वामी विवेकानंद जीवना वर नाटक , संगीत , सांस्कृतिक , बालपन , मोठेपन , पाठलेखन , सादर केले . कार्यक्रमात बीकेसीपी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. के.एस.नाथ , आदर्श हायस्कुल कन्हान च्या मुख्याध्यापिका सौ.चंद्रकला मेश्राम , पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालया चे मुख्याध्यापक मा.पुरूषोत्तम खेरगडे , स्वामी गुणदानंद महाराज सह आदि मान्यवरांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चिरित्र्यावर प्रकाश टाकुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर कार्यक्रमात मान्यवरांचा हस्ते शिक्षकांचे , विद्यार्थांचे विवेकानंद यांचे स्मृति चिन्ह आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले . कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन भाग्यश्री नखाते मॅडम यांनी केले आणि आभार बळीरामजी दखने हायस्कुल चे जेष्ठ शिक्षक सचिन अल्ल्हडवार सर यांनी केले
या प्रसंगी बळीरामजी दखने हायस्कुल चे पर्यवेक्षक ज्ञानप्रकाश यादव , स्वामी ब्रम्हानंद महाराज , के.सी.कंपनी चे माजी प्रबंधक अजय भोयर , विजय महाराज , कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष ऋषभ बावनकर , युसीएन न्यूज़ चे पत्रकार विमल त्रिपाठी , शाहरुख खान , शेंडे सर , सह आदि शिक्षक , शिक्षिका , विद्यार्थी , मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सौ.जे.एन.वानखेडे , अमित थटेरे , एस.ए.कोहळे , डी.एन.बांबल , माधव काटोके , एन.आर.चव्हान , सी.डी.चौकसे , व्ही.आर.मोटघरे , व्ही.के.भरडे सह आदि शिक्षक , शिक्षिकांनी सहकार्य केले.