संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
12 जानेवारी 2023 रोज गुरुवारला लवारी येथे साकोली तालुका फार्मर प्रोडूसर कंपनीच्या वतीने अशोक कापगते यांच्या मका पिकावर गरुडा ड्रोन फवारणी यंत्राणे लवारी येथील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यावेळी कंपनीचे अध्यक्ष आर. एम.झोडे, उपाध्यक्ष अनिल किरणापुरे विकास कटरे, आनंद कापगते, घनश्याम लांजेवार ,शिवचरण लांजेवार, शालीकराम लांजेवार,चंद्रहास किरणापुरे, अशोक कापगते, शिवचरण लांजेवार, बघेल सर, शिवप्रसाद कापगते ,अशोक कटनंकर , हेमराज कापगते, मोहन मेश्राम, चंदन लांजेवार,व गरुडा कंपनीचे कर्मचारी व समस्त लवारी शेतकरी उपस्थित होते.
कंपनीला मुलाखत देताना अनिल किरणापुरे म्हणाले की तंत्रज्ञानाची जोड देऊन हायटेक शेती पिकांवर फवारणीसाठी ड्रोन चा वापर काळाची गरज ठरेल, शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी यंत्र भविष्यात वरदान ठरेल, गरुडा ड्रोन च्या माध्यमातून शेतातील अनेक पिकांवर फवारणी करता येते हा संदेश युवा शेतकऱ्यांसाठी व आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोलाचे ठरेल. यामुळे वेळेची बचत ,मजुरांची बचत, औषधांची बचत, पाण्याची बचत होते व एका दिवसात जास्तीत जास्त शेती क्षेत्रात औषध मारून होते.
ड्रोनमध्ये सध्या १० लिटर द्रावण फवारणीची क्षमता आहे. याद्वारे एकसारखी फवारणी शक्य होते. एका चाचणीतील निष्कर्षाप्रमाणे अशा फवारणीसाठी शेतकऱ्यांना एकरी ८०० रुपये मोजावे लागतात. शेतकऱ्यांना मजुरीही इतकीच लागते. मात्र ड्रोनच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांची काम वेगाने होणार आहे.
-मजुरांमुळे शेतातल्या नाजुक पिकांची होणारी नासधूसही ड्रोन फवारणीमुळे होणार नाही.
सर्वेक्षणासाठी ड्रोन भारतात शेतीमध्ये फवारणी, मॅपिंग, पिकांचे निरीक्षण आणि जमिनीच्या मूलभूत घटकांचे मूल्यांकन करण्यासाठी ड्रोन वापरले जाऊ लागले आहे. ड्रोन व विविध प्रकारच्या सेन्सरच्या साह्याने जमिनीतील व पिकातील अन्नद्रव्यांची माहिती संकलित करता येते. संकलित केलेल्या या माहितीचे एकत्रित विश्लेषण केले जाते. पुढील टप्प्यामध्ये या माहितीला यांत्रिक शिकावूपणांची (मशिन लर्निंग) जोड देता येईल. यामुळे पिकांच्या गरजा जाणून, आपोआप योग्य प्रमाणात खते, कीटकनाशके आणि पाणी देता येऊ शकते. असे ते बोलत होते.