नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली : आताच्या युगातील नवतरूण नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांनी आता आपले गावं कसे स्मार्ट ग्राम तयार होईल याकडे विशेष लक्ष देऊन अगदी पारदर्शकपणे विकासाची कास धरा असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी ( दि. १३.जाने.) नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळ्यात साकोली येथे केले. याप्रसंगी काही नवनिर्वाचित सदस्यांनी उत्साहपूर्ण काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

           नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित महिला पुरूष सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा मंगलमूर्ती सभागृह साकोलीत पार पडला. मंचावर आमदार नाना पटोले, आमदार नागपूर अभिजित वंजारी, नाना गावंडे, जि.प.अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई, जि.प. सभापती रमेश पारधी, मदन रामटेके, तालुका अध्यक्ष होमराज कापगते, जि.प.स. शितल राऊत, मनोहर राऊत, नारायण वरठे, पं.स.स. सरीता करंजेकर, अर्चना इळपाते, क्रिष्णा कोयाडवार, मधूकर लिचडे, शहराध्यक्ष काँग्रेस अश्र्विन नशिने, डॉ. अशोक कापगते, सभापती गणेश आदे, जिल्हा अध्यक्ष कामगार मार्कंडराव भेंडारकर, डॉ. अनिल शेंडे, सविता ब्राम्हणकर, उमेश कठाणे, दामोधर नेवारे व अन्य हजर होते. अध्यक्षीय भाषणात आ. नाना पटोले म्हणाले की गेल्या ५ वर्षात साकोली शहराचा हाल बेहाल बघा कारण आज जो नगरपरीषदेमध्ये शहरस्तरावर विकास पाहिजे तो मुळीच झाला नाही, त्याला कारण की पारदर्शकपणे काम न करता लोकांना विकासाच्या नावाखाली फसविण्यात आले, आज साकोली शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची ५ मजली सुसज्ज इमारत आणि संपूर्ण आरोग्य सुविधायुक्त इस्पितळ तयार होते आहे यासाठी माणसाचं मातृभुमिसाठी मोठं मन लागते व करून दाखवावे लागते. पण आपण आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू करा आज जास्तीत जास्त सदस्य शिक्षित निवडून आले असून संधीच सोन व विकासाची कास धरून एकजूटीने विकास कशाला म्हणतात ते दाखवून द्या असे ठामपणे सांगितले. कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावांतील नवनिर्वाचित सदस्यांनी आ. नाना पटोले यांचे समक्ष काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सत्कार समारंभास सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि पाचशेच्या वर कार्यकर्ते हजर होते. संचालन हरगोविंद भेंडारकर यांनी तर आभार पं.स.स. होमराज कापगते यांनी केले. सोहळा यशस्वी होण्यासाठी स्वीय सहाय्यक उमेश भेंडारकर, राजू पालीवाल, नेपाल कापगते, डॉ. दिपक मेंढे, संदीप बावनकुळे, विजय दूबे, लालू करंजेकर, नरेश करंजेकर, दिलीप निनावे, भाष्कर खोब्रागडे, शंकर ब्राम्हणकर आणि साकोली तालुका व शहर पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com