डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.13: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक -2022 च्या निवडणूक अनुषंगाने सर्व शिक्षक मतदारांना सुचित करण्यात येते की, मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे कडून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दिनांक 30.01.2023 रोजी सकाळी 08.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंतची वेळ ठरवून दिलेली होती. परंतू त्यात मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी बदल करुन या निवडणूकीसाठी मतदान करण्याची वेळ सकाळी 7.00 वाजेपासून ते दुपारी 3.00 वाजेपर्यत राहिल असे कळविले आहे. तरी या निवडणूकीमध्ये शिक्षक मतदारांनी वरील वेळेत जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर विभाग, शिक्षक मतदार संघ तथा जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

 

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com