नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कुल सीबीएसई जमनापुर/साकोली येथे जि.के. ऑलिम्पिऑड पदकांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बक्षिस वितरणाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मा. मुजम्मिल सय्यद, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, विनोद किरपान, सतिश गोटेफोडे व वंदना घोडीचोर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय जि.के. ऑलिम्पिऑड परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांना १३ सुवर्ण पदकांचे वितरण करण्यात आले. या बक्षिस वितरण सोहळ्याप्रसंगी प्राचार्य मा. मुजम्मिल सय्यद यांनी पदक व प्रमाणपत्र वितरण करून सर्व विद्यार्थ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय प्राचार्य, पर्यवेक्षिका, वरिष्ठ शिक्षिका, विनोद किरपान, सतिश गोटेफोडे, जयंत खोब्रागडे, चंद्रकांत भावे, वंदना घोडीचोर, रोझी पठान, स्मिता उपरीकर, सरताज साखरे व समस्त शिक्षक वर्ग यांना दिले.
सुवर्ण पदकाचे मानकरी ठरणारे विद्यार्थी स्माही पर्वते, निधी येगे, अर्नव सेलुकर, मनहर महाल्ले, यर्थाथ बोपचे, साहिल चांदेवार, मैथिली राउत, भार्गव हटवार, आयुष बिस्वास, अक्षरा लांबकाने, मृनाली कुंभरे व अर्नव भुते होते.
कार्यक्रमाचे संचालन वंदना घोडीचोर व आभार दिपा येडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नवजीवन मधील शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे योगदान दिले.