कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-नगर पंचायत पारशिवनी व द लॉर्ड पब्लिक स्कुल यांच्या संयुक्त विद्यमानाणे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयती निमिताने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा च्या अनुषंगाने पथनाट्यचे सादारीकरण करण्यात आले. व नायलॉन माजा चा वापर टाळण्याकरिता विद्याथांनी पारशिवनी शहरातील नागरिकांना संदेश दिला.
नगरपंचायत पारशिवनी व द लॉर्ड पब्लिक स्कुल यांच्या संयुक्त विद्यमानाणे स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा , राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्य 12 जानेवारी 2023 रोजी नगरपंचायत पारशिवनी क्षेत्रातील गांधी चौक पारशिवनी येथे पथनाट्या सादरीकरण करण्यात आले. मा.मुख्याधिकारी अर्चना वंजारी (भिवगडे), नगर पंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता ,रक्तदान, नायलॉन माजा चा वापर टाळण्याकरिता विद्यार्थांनी पारशिवनी शहरातील नागरिकांना संदेश दिला. तसेच नगरपंचायत कर्मचारी स्वच्छता लिपिक रोशन येरखेडे ,शहर समन्वयक भुषण वाघचौरे, रामेश्वर मेश्राम, श्वेता ढेकले, चेतन गावंडे, प्रवीण सायरे, रिगल चौधरी आदीं यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.