सरकार बदलल नसतं तर राज्याचा विकास झाला नसता :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…  — शिवसेना उमेदवार अभिजित अडसूळांसाठी दर्यापूरात जाहीर प्रचार सभा… 

युवराज डोंगरे

    उपसंपादक

         दर्यापूर कल्याणकारी योजनांना गती देण हे काम आमच्या महायुती सरकारने करुन दाखवल. आणखी पुढेही विकास करायचा आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

          दर्यापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या प्रचारार्थ मंगळवारी आयोजित दर्यापूरातील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर महाविजय संकल्प सभेला स़बोधित करतांना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

             पुढे बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत सरकार बदलल नसतं तर राज्याचा विकास झाला नसता. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो आणी बंड केल.

          सत्ताबदल झाल्यावर आमच्या सरकारने विविध योजना जाहीर करत प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे हे सरकार देणार आहे घेणार नाही असा फरक जनमाणसाला लक्षात आला आहे. 

           या निवडणुकीत दर्यापूर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार विजयी करा व पुन्हा सरकार आल्यास दर्यापूरची सुतगिरणीचा प्रश्न मार्गी लावणार तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना,मुलींना मोफत शिक्षण सुरूच राहील यासह विविध घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.

          तसेच राणा दाम्पत्यांनी महायुती सोबतराहुन विरोधात काम करण बरोबर नाही.महायुतीची शिस्त त्यांनी पाळावी असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

          यावेळी माजी केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ,भाजपाचे प्रभारी सुभाष पटेल,माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे,भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी,माजी जिल्हाध्यक्ष निवेदीता दिघडे,जयंत डेहनकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष महात्मे,प्रशांत ठाकरे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.