विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन लोकशाहीचा सन्मान करावा सरपंच चित्रलेखा ढोले…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

         प्रत्येक मतदारांनी आप आपल्या गावामध्ये मतदान जागृती करून मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीयहित व लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन लोकशाहीचा सन्मान करावा, असे आवाहन सरपंच चित्रलेखा ढोले यांनी केले.

          आपल्या भारत देशात लोकशाहीची संकल्पना अस्तित्वात आल्यापासून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार घटनेने दिला आहे.

       सर्वांनी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा व आपला प्रतिनिधी विधानभवनात पाठवावा. 

         इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी, बावडा परिसर तसेच महाराष्ट्रातील सर्वच भागांमधील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय हिताचे काम करावे, लाखेवाडी गावच्या विद्यमान सरपंच चित्रा ढोले बोलत होत्या.