सिंदेवाही प्रतिनिधी

 अमन कुरेशी

दखल न्यूज़ भारत

 

 सिंदेवाही नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या नगर पंचायत क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेचे (घरकुल) अनुदान न मिळाल्याने घरकुल लाभार्थी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १३५ लाभार्थ्यांसाठी पहिला DPR तयार करण्यात आला.

 त्याअनुषगाने राज्य शासनाचे पहिल्या आठवड्याचे ४०,०००/- आणि दुसर्‍या आठवड्याचे ६०,०००/- अनुदान वितरीत करण्यात आले.

  केन्द्र शासनाचा दूसरा हफ्ता ६००००/- व तीसरा हफ्ता ३०,०००/- असे एकूण ९०,०००/- प्रति लाभार्ती प्रमाणे अनुदान प्राप्त झालेले नाही 

सदर (घरकुल) योजनेसाठी नागरीकानी य बँक, बचत गटाकडून कर्ज घेऊन या (घरकुल) योजनेचे बांधकाम पूर्ण केले.या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने काही नागरिकांच्या घराची कामे अपूर्ण राहिल्याने लाभार्थी आजही भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यामुळे नागरिकांचे मालकीचे घर अपूर्ण राहिले असून  

लाभार्ती भाड्याच्या घरासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे.

 सदर योजनेंतर्गत निधी प्राप्त न झाल्यामुळे नागरिकांना आर्थिक स्थितिचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रति लाभार्थी ९०,०००/- प्रमाणे १२७ लाभार्थ्यांना केंद्र शासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊन नागरिकांना आर्थिक संकटातून दिलासा द्यावा.

 अशी मागणी सिंदेवाही नगरपंचायत चे उपाध्यक्ष मयूर सूचक यांनी केंद्र शासनास केली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News