चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:- स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील भाषा अभ्यास मंडळ मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषा मंडळातर्फे आज दिनांक 12 नोव्हेंबर रोज शनिवारला आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेला मार्गदर्शन म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवेश गोंडाणे आणि अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, मराठी विभाग प्रमुख डॉ बंडू चौधरी व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ रामभाऊ कोटांगले प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार देवेश गोंडाणे यांनी पत्रकारिता संधी आणि आव्हाने या विषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. पत्रकारिता ही तटस्थ भूमिकेतून केली पाहिजे आणि पत्रकारिता हा पैसे कमावण्याचा व्यवसाय नसून समाजातील समस्या सरकार दरबारी मांडणे आणि त्यातून समाजोपयोगी कामे केल्यानंतर मिळणारे समाधान हे पैस्यात मोजता येत नाही, असे ते यावेळी बोलत होते.
यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन अध्यक्ष प्राचार्य डॉ कापसे यांनी सांगितले की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारिता व्यवसायाबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे यासाठी तालुक्यातील महाविद्यालयांनी यात भाग घेतले याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी संताजी महाविद्यालय, पालांदुर, विदर्भ महाविद्यालय, लाखनी, एन पी डब्ल्यू महाविद्यालय, तुपकर मुरमाडी, येथील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी डॉ संजय निंबेकर, डॉ नीलमा कापसे, डॉ श्रीकांत भुसारी, प्रा. ज्योती शेळके यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बंडू चौधरी, संचालन प्रा वैशाली लिचडे, आणि आभार प्रा. अंकिता शेंडे यांनी मानले.