पंकज चहांदे

दखल न्यूज भारत

 

देसाईगंज – वर्तमान स्थितीत देशात जातीवादाच्या राजकारणाला उत आले असुन महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य यासारख्या सर्व सामान्य गोरगरीबांशी निगडित समस्यांवरून लक्ष विचलित करून दररोज अराजकतेला खतपाणी घातले जात आहे. यामुळे देशाची अपरिमित हानी होत असुन देशातील माणुस माणसापासुन दुर जाऊ लागल्याने सद्भावना लोप पावत चालली आहे. हे जोडण्याचा मुख्य उद्देश समोर ठेऊनच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो याञेच्या माध्यमातून तुटलेली मने जोडण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याने या याञेत प्रत्येक भारतीयांनी सहभागी होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.

     देसाईगंज येथील सिंधु भवनात देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने भारत जोडो याञा नियोजन बैठक व तालुका काँग्रेस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असता अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महासचिव तथा जिल्हा काँग्रेस प्रभारी डाॅ.एन. डी. किरसान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नितीन कोडवते, जेसा मोटवाणी, यादवराव ठाकरे, आनंदराव आकरे, नंदु नरोटे, लतीफ रिज़वी, परसराम टिकले, नितीन राऊत, राजु रासेकर, डाॅ.विनोद नाकाडे, प्रकाश सांगोळे, आरती लहरी, आरीफ खानानी, महादेव कुंमरे, अरुण कुंभलवार, पंढरी कावळे, हमनोहर निमजे आदी काँग्रेस पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

     पुढे बोलताना ब्राम्हणवाडे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसने मौलिक भुमिका बजावली असली तरी खोटं बोलुन देशातील युवकांना, शेतकऱ्यांना, वृद्ध निराधारांना आशेवर जगण्यास भाग पाडुन भावनेचा बाजार मांडला नाही. माञ विरोधकांनी काँग्रेसच्या विरोधात खोटा प्रचार करून मागील आठ वर्षापासून देशात जी अराजकता माजवली आहे,खोटे आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल केली आहे. हे जरी लोकांच्या लक्षात आले असले तरी नेतृत्व करण्याची क्षमता काँग्रेसमध्येच असल्याचे लक्षात आल्याने भारत जोडो याञा ही कुण्या एका पक्षाची नाही तर ते देशव्यापी आंदोलन होत चालले आहे. या आंदोलनाचे प्रत्यक्षदर्शी होण्याची संधी आपल्याला चालुन आली असल्याने आपली जबाबदारी समजुन या यात्रेत प्रत्येक भारतीयांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

    तथापी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात बोलताना माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी सांगितले की वैचारिक मतभेद असु शकतात, पण जेव्हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न येतो, तेव्हा सर्वांनी मतभेद विसरून एकञ येणे गरजेचे आहे.खोटं बोला पण रेटून बोला या युक्तीचा वापर करून देशातील लघु उद्योग संपवुन शेतकऱ्यांना, बेरोजगारांना देशोधडीला लावल्या गेले आहे. यामुळे युवकांच्या मनात प्रचंड निराशा आहे. यातुन फक्त काँग्रेसच देशाला तारु शकत असल्याचे अलिकडच्या राजकारणातुन स्पष्ट होऊ लागल्याने युवकांनी, शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी समोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

      कार्यक्रमाचे संचालन युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष विलास ढोरे, प्रास्ताविक गडचिरोली जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष लतीफ रिज़वी यांनी तर आभार तालुका काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र बुल्ले यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तालुक्यातील काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com