नीरा नरसिंहपुर दिनांक :12

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील समाधी सोहळ्यासाठी सालाबाद प्रमाणे राज्यातून व राज्या बाहेरील भाविक भक्त व वारकऱ्यांच्या दिंड्या लाखोंच्या संख्येने आळंदी कडे जाऊ लागल्या श्री गुरु सोपान काका महाराज देहूकर पंढरपूर यांची सांप्रदायिक दिंडी सोहळा प्रमुख, श्रीगुरु बापूसाहेब महाराज,, श्रीगुरु बाळासाहेब महाराज श्रीगुरु,, कानोबा महाराज, यांच्या मार्गदर्शना खाली पुराण काळापासून परंपरे नुसार चालू आहे. पायी दिंडी सोहळा दिनांक 8/11 ते 17/11/2022 पर्यंत पंढरपूर पासून ते आळंदी देवाची या ठिकाणी जाण्यासाठी दिंडी मार्गस्थ झाली. आहे.

पिंपरी बुद्रुक येथील सुतार समाजाच्या वतीने,, सुतार वस्ती येथील भाविक भक्त चंद्रकांत बाबुराव सुतार यांच्या निवासस्थानी सांप्रदायिक दिंडी सोहळ्यासाठी चहापाणी नाष्टा देण्यात आला. तसेच पिंपरी बुद्रुक येथे भाविक भक्त व ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक यांच्या वतीने पिंपरी गावामध्ये दिंडी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच पिंपरी बुद्रुक गावचे उद्योजक शरद विठ्ठल बोडके यांच्या वतीने दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व चहापाणी करण्यात आला. 

श्रीगुरु सोपान काका महाराज देहुकर यांच्या सांप्रदायिक दिंडी सोहळ्या सोबत सर्व भाविक भक्त, दिंडी चोपदार सहादेव तमालवाडी, उद्धव काजवे, शंकर डोळसकर, नागनाथ पाटील, बाळासाहेब निकम, भानुदास जाधव, भाऊ पाटील, सोपान सोलंकर, या सर्वांच्या उपस्थितीत कार्तिकी वारीसाठी सर्व भाविक भक्तांच्या व महिला भगिनींच्या उपस्थितीत दिंडी सोहळा पुढील ठिकाणी मुक्कामी जाण्यासाठी मार्गस्थ झाला.

 

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com