तालुक्यातील कन्हान येथे स्टेशन रोड जवळ सम्राट अशोक विजयादशमी निमित्त सद्धम्म  बौद्ध विहार कन्हान आणि राजे फॉउंडेशन कन्हान तर्फे करण्यात आले भोजन दान…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- तालुक्यातील कन्हान येथे स्टेशन रोड जवळ सम्राट अशोक विजयादशमी निमित्त आज शनिवार सकाळी ११ : ०० वाजता च्या दरम्यान सद्धम्म बौद्ध विहार कन्हान आणि राजे फॉउंडेशन कन्हान तर्फे विजयादशमी निमित्ताने भोजन दानचे आयोजन करण्यात आले.

         कार्यक्रमांचे मुख्य आयोजन चेतन भिवगडे यांनी सांगितले के संस्थे व विहार मार्फत विजयादशमी च्या दिवसी दरवर्षी प्रमाणे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या बुद्ध उपासक आणि उपासिका करिता स्टेशन रोड कन्हान येथे भोजनदानाचा कार्यक्रम राजे फॉउंडेशन कन्हान चे अध्यक्ष केतन कैलास भिवगडे आणि सत्तधम्म बोद्ध विहार कन्हान याचा पदाधिकारी यांचा तर्फे करण्यात आले.

          कार्यक्रम मध्ये उपस्तीथी माजी सरपंच कैलास जी भिवगडे, शिवशंकर जी भिवगडे, सिद्धार्थ राऊत, रामाजी पाटील, बंडुजी मानकर, रोशन सोनटक्के, चंद्रगुप्त भिवगडे, रितेश जनबंधू, स्वप्नील भिवगडे, गणेश जामकर, आश्वामेघ पाटील, निलेश गाडवे सह सद्धम बुद्ध विहारचे उपासक उपासिका मोठे संख्येत उपस्थित राहुन भोजनदान केले.