युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फेत गायवाडी फाटा ते कळाशी रोडचे काम सुरु आहे. त्या कामा मध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहीत्य वापरले जात आहे व ते निकृष्ट दर्जाचे साहीत्य वापरल्यामुळे रोड वरुन प्रवास करतांनी निर्माण होणार्या धुळीमुळे आजु बाजुच्या शेतीतील पीकाला त्रास होत आहे व रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत रोडच्या कामाची निविदा देतांनी अटी व शर्ती लावुन कंत्राट दिले आहे, पण सदर कंत्राटदार त्या अटी व शर्तीचे पायमल्ली करत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाना तसेच रोडनी प्रवास करणार्या प्रवाशांचे अपघात प्रमाण वाढत आहे.सदर रोडचे बांधकाम मनमानी सुरु असतांनी आपले विभागामार्फेत त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही आहे त्यामुळे आपले कर्मचारी व ठेकेदार यांचे साठलोट असल्याचे निर्देशनात येत आहे.
त्यामुळे सदर कामाची आपल्या स्तरावरुन चौकशी करावी व शेतकर्याच्या झालेल्या पीकांची नुकसान भरपाई हेक्टरी दिड लक्ष रुपये द्यावी. ते निकृष्ट दर्जाचे काम बंद न झाल्यास योग्य कार्यवाही न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना मार्फेत येत्या 7 दिवसात जनआंदोलन उभारण्यात येईल या होणार्या जन आंदोलनास आपण जबाबदार राहाल.अशा प्रकारचे निवेदन युवासेना पदाधिकारी शेतकरी बांधवानी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, मोहन खरबळकर, रामा गावंडे उपसरपंच कळाशी, दत्ता राणे, संजय जामनिक, संदीप खर्चान, गजानन चक्रे, वैभव ढगे, चेतन ठाकरे, सतीश जामनिक,आशिष देवतळे, पिंटू कळस्कर, संतोष साखरे, कृष्णा गावंडे, मनोज लाड, विशाल बगाडे, आशिष लायडे, शंतनू हाडोळे, मनोज लोखंडे, अंकुश गावंडे, बळीराम राणे, दत्तात्रय राणे तसेच शिवसैनिक आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.