ऋषी सहारे
संपादक
कोरची- तालुक्यापासून ०८ किमी अंतरावर येत असलेल्या दवंडी गावातील एका व्यापाराची पाच ते सहा अज्ञात इसमांनी घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरडून हत्या केल्याची थरारक घटना गुरुवारी उघडकीस झाली आहे.
लखन सुन्हेर सोनार वय ३८ वर्ष राहणार दवंडी,धंदा किराणा व्यापारी असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
सदर घटना ११ ऑक्टोंबर बुधवारी रात्री दहा ते अकरा वाजता दरम्यान मृतकाच्या राहत्या घरी दवंडी येथे घडली आहे.काळे कपडे घातलेले पाच ते सहा अज्ञात इसम लखन सोनार यांच्या घरी घुसून पत्नी सरिता लखन सोनार वय ३७ वर्ष हिला आरडाओरड करू नये म्हणून धमकावून पकडून ठेवून लखन सोनारची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली व अज्ञात इसम घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पत्नी सरिता हिने दिली.
या घटनेनंतर पत्नी सरिताने रात्रीच आजूबाजूच्या लोकांना घटनेची माहिती दिली.तसेच या घटनेची माहीती बेळगाव पोलीस मदत केंद्र येथे देण्यात आल्यावर पोलीस मदत केंद्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दवंडी येथे जाऊन मृतक लखन सोनार यांची शव ताब्यात घेतला आणि शविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय कोरचीत आणले.
शविच्छेदना पूर्वी वैद्यकीय अधिकारी राहुल राऊत यांनी मृतक लखन सोनार यांच्या मृत्यूनंतरही त्या अज्ञात इसमांनी मृतकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सतत वार केले असल्याचा अंदाज व्यक्त केला.
मृतक लखन सोनार यांच्या पश्चात पत्नी सरिता लखन सोनार,१६ वर्षीय मुलगी पायल व १२ वर्षीय मुलगा प्रणय असा कुटुंब आहे.मृतक लखन सोनार यांचे वडील सुन्हेर सोनार हे कोरची येथे राहतात.
या घटनेचे तपास बेडगाव पोलीस अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी करीत आहेत.