जात वैधता प्रमाणपत्राच्या त्रृटीबाबत 17 ऑक्टोबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन…

ऋषी सहारे

संपादक

     गडचिरोली, दि. १२ : सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायिक पाठयक्रमातील आणि सेवा व निवडणुकीचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत दाखल केलेले प्रस्ताव निकाली (त्रुटीचे प्रकरणे वगळता) काढण्यात आलेले आहेत. तरी ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या ई-मेल आय.डी. वर आजपर्यंत प्राप्त झालेले नाही.

          अशी सर्व प्रकरणे त्रुटीत असल्याने अर्जदारानी कार्यालयीन वेळेत दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे. सदर त्रुटीची पूर्तता न केल्यास सर्वस्वी जबाबदारी ही अर्जदाराची राहील.

        तसेच 11 वी, 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेणे सुरू आहे. तरी सर्व अर्जदारांनी कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देवसुदन धारगावे यांनी केले आहे.